SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीर अभियानाचे आयोजनपावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज; आंतरराज्य समन्वयावर भरकोल्हापूर मनपा स्तर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा उत्साहात; महाराष्ट्र हायस्कूल, उषाराजे हायस्कूल ठरले विजेते!वारणा दूध संघाचा ५८ वा वर्धापन दिन उत्साहात कोल्हापूर महापालिका : भंगारात निघालेल्या आणखीन दोन आरसी गाड्यांचं अतिक्रमण निर्मूलन ट्रकमध्ये रूपांतर कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस: धरणांच्या पाणीपातळीत वाढ, १९ बंधारे पाण्याखालीजगातील पहिली मानवी शक्तीवर आधारित पृथ्वी प्रदक्षिणादिल्ली हादरली: 'कॉकरोच जनता पार्टी'चा संसद मार्च हिंसकअजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी जनसेवा सप्ताहाचा प्रारंभकोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस: धरणांच्या पाणीपातळीत वाढ, १९ बंधारे पाण्याखाली

schedule21 Jul 26 person by visibility 137 categoryराज्य

कोल्हापूर: जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे प्रमुख धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून पाटबंधारे विभागाने २१ जुलै २०२६ रोजीचा दैनिक पाणी पातळी अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत असून काही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.

▪️प्रमुख धरणांची स्थिती:
राधानगरी धरण ७८ टक्के भरले असून त्याचा पाणीसाठा समाधानकारक आहे. तसेच घटप्रभा आणि जांबरे धरणे शंभर टक्के भरली आहेत. आजरा तालुक्यातील सर्फनाला मध्यम प्रकल्प २० जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७:४५ वाजता पूर्ण क्षमतेने भरला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

▪️नद्या व बंधाऱ्यांची स्थिती:
पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी सकाळी ७:०० वाजता २८ फूट ९ इंच नोंदवली गेली. पाणीपातळी वाढल्यामुळे पंचगंगा, कासारी, भोगावती, वेदगंगा आणि कुंभी नदीवरील एकूण १९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

▪️पाण्यात गेलेल्या प्रमुख बंधाऱ्यांमध्ये शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ (पंचगंगा नदी), यवलूज, पुनाळ तिरपन (कासारी नदी), सरकारी कोगे, खडक कोगे, हळदी (भोगावती नदी), निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे (वेदगंगा नदी) आणि शेणवडे, कळे, सांगरुळ (कुंभी नदी) यांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाकडून पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes