+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule03 Jul 24 person by visibility 467 categoryगुन्हे
 कोल्हापूर : कौलव (ता. राधानगरी) येथुन ग्रामपंचयात सदस्यांनी पोलीस ठाणेस फोनद्वारे माहीती दिले की, कौलव येथिल शरद धर्मा माने याचे घरी खड्‌डा काढून काही मांत्रिकांचे उपस्थितीत अघोरी कृत्य सुरु आहे. त्यावेळी पोलीस अधिकारी स्टाफसह कौलव येथे तात्काळ जावून शरद धर्मा माने याचे घरी जावून पाहणी केली. त्यावेळी तेथे देवघरामध्ये खड्डा काढणेचे काम सुरु होते तसेच आजुबाजुला लिंबू व पुजेचे इतर साहीत्य पडलेले दिसले. त्यानंतर घरमालक व मांत्रिकासह इतर ५ जणास साहीत्यासह, पोलीस ठाणेस आणणेत आले. 

त्यामध्ये अधिक चौकशी अंती मांत्रिक महेश सदाशिव काशिद यांनी गुप्त धन शोधून देतो हे अमिष दाखवून त्यांनी त्यासाठी शरद माने यांचे घरामध्ये गुप्तधन शोधणेसाठी खड्‌डा खणत होते. अशी माहीती मिळाली.

त्यानंतर पोलीस ठाणेस सदरच्या ६ आरोपीविरोधात, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलन ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचे तपासकामी १) शरद धर्मा माने वय ५२ रा. कौलव ता. राधानगरी २) महेश सदाशिव काशिद (मांत्रिक) वय ४५ रा.राजमाचे ता. कराड जि-सातारा ३) अशिष रमेश चव्हाण वय ३५ रा. मंगळवार पेठ कराड जि. सातारा, ४) चंद्रकांत महादेव धुमाळ वय ४० रा. मंगळवार पेठ कराड जि-सातारा ५) संतोष निवृत्त लोहार वय ४२ रा. वाझोली ता.पाटण ज-सातारा ६) कृष्णात बापु पाटील वय ५५ रा. पुलाची शिरोली ता. हातकणंगले अशा लोकांना अटक केली असून त्यांचेकडे अधिक चौकशी करून तपास करत आहोत.