SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विद्यापीठात एक दिवसीय कार्यशाळाभाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर उत्साहात प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्या : सतेज पाटील ‘गोकुळ’ कडून महिला दूध उत्पादकांसाठी ‘नारी सन्मान विमा योजना’ : चेअरमन नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी 14 वा दीक्षांत समारंभ; पूज्य डॉ. ज्ञानवत्सल स्वामी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथीविद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी 'केआयटी' प्रशासन खंबीर; दोषी प्राध्यापकावर तातडीने निलंबनाची कारवाई!महिला दिनानिमित्त महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमइंधन टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनकोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागरविद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

जाहिरात

 

प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्या : सतेज पाटील

schedule07 Mar 26 person by visibility 88 categoryराज्य

कोल्हापूर  :  राज्य सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात बडा घर पोकळ वासा आहे. निवडणुकीत जी आश्वासने सरकारने दिली होती ती पाळली नाहीत. शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करण्याचा शब्द सरकारने सोयिस्करपणे फिरवला आहे. अशी टीका विधानपरिषद कॉग्रेस गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.

कोल्हापूरमधील ७० टक्के शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच लाख हून अधिक शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज परतफेड केलेली आहे.  या प्रामाणिक शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत प्रोत्साहन अनुदान द्यावे.  जाचक नियम व अटी न लावता सरसकट सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे.

 तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न वाढत असताना अर्थसंकल्पात ठोसपणे यावर उपाय काढलेला नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे आकड्यांचा खेळ आणि जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे. हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या खऱ्या वेदनेवर फुंकर घालण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. राज्य सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे कॉन्ट्रॅक्टर पास अन शेतकरी, मध्यमवर्गीय, युवक नापास असाच आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes