SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इंधन टंचाईबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनकोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागरविद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्रचैतन्य बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळावर प्रशासक नियुक्तमहिला दिनाचे औचित्य साधत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा राज्यस्तरीय प्रारंभ बोगस उपचारांची पडताळणी करुन कारवाई करा : पोलीस उपधीक्षक तानाजी सावंतडीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय युवा उद्योजक परिषदेत विजेतेपदकृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही ग्रंथालयांचे महत्त्व अबाधित: डॉ. ज्योती जाधवसमाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची कर्नाटक, तमिळनाडूतील सेवाभावी संस्थांना भेटस्वस्त आणि दर्जेदार उपचार: 'जन औषधी' ठरतेय सामान्यांचा आधार!

जाहिरात

 

विद्यापीठात ‘जीएसटी’च्या अनुषंगाने २३ मार्चपासून राष्ट्रीय चर्चासत्र

schedule07 Mar 26 person by visibility 119 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभाग आणि भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “जीएसटी रिफॉर्म्स, डिजीटायझेशन अँड इझ ऑफ डुईंग बिझनेस: मार्चिंग टूवर्ड्स विकसित भारत@२०४७” या विषयावर दि. २३ मार्चपासून दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले आहे. ही माहिती अधिविभागाचे प्रमुख डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी दिली आहे.

या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रासाठी केंद्रीय जीएसटी व केंद्रीय उत्पादन शुल्क, वडोदरा येथील प्रधान आयुक्त सुरेंद्र मानकोस्कर प्रमुख पाहुणे म्हणून तर केंद्रीय विद्यापीठ, कर्नाटक येथील डॉ. व्ही. पांडुरंग बीजभाषक म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी अध्यक्षस्थानी असतील. या दोन दिवसीय चर्चासत्रामध्ये ‘आयसीएआय’च्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य उमेश शर्मा, धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठातील डॉ. अंजू ताम्रगुंडी, नामदेव गवस (गोवा), सी.ए. आदित्य सोनटक्के (मुंबई) हे तज्ज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

जीएसटी सुधारणा, डिजिटलायझेशन, व्यवसाय सुलभता आणि विकसित भारत@२०४७ या विषयांवर चर्चासत्रात सखोल चर्चा होणार असून देशभरातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. या चर्चासत्रासाठी संबंधित क्षेत्रातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी व इच्छुकांनी सहभागासाठी नोंदणी करावी तसेच शोधनिबंध सादर करावेत, असे आवाहनही डॉ. महाजन यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes