SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळमधील शासननियुक्त सदस्यांच्या निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार!, भगवा चौकात शासनाच्या पुतळ्याचे दहन; सोमवारी २५ हजारांहून अधिक नागरिकांचा भव्य मोर्चा निघणारउदगावच्या कुंजवन जैन मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्तमुंबईच्या मेट्रोत वारणा ब्रँडचा विस्तार/गिरगाव स्थानकात विक्री केंद्राचे उदघाटनकोल्हापुरात फुलेवाडी रिंगरोडवरील सराफ दुकानात दरोड्याचा प्रयत्न; ४ तासांत आरोपी जेरबंद, १ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगतशैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासह शाळांच्या संवर्धनासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविणार!, नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांची ग्वाहीपदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारात महाराष्ट्राची दमदार झेपगोकुळसंदर्भातील राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरात संताप... राजेंद्रनगर चौकात ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ चा फलकप्रकाशशोधक भारतरत्न डॉ. सी. व्ही. रामन: भारतीय विज्ञानाचा देदीप्यमान तारागोकुळ दूध संघात शासकीय संचालक नियुक्त; राज्यपालांची अध्यादेशाला मंजुरीफटाक्यांच्या धुरात नाही, पणत्यांच्या प्रकाशात साजरी करू दिवाळी!

जाहिरात

 

गोकुळमधील शासननियुक्त सदस्यांच्या निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार!, भगवा चौकात शासनाच्या पुतळ्याचे दहन; सोमवारी २५ हजारांहून अधिक नागरिकांचा भव्य मोर्चा निघणार

schedule07 Nov 26 person by visibility 76 categoryराजकीय

कसबा बावडा  : गोकुळ दूध संघातील शासननियुक्त सदस्यांच्या निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार एल्गार पुकारला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ कसबा बावडा येथील भगवा चौकात शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून टाकला.

या आंदोलनात कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरातील दूध उत्पादक शेतकरी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गोकुळमधील शासननियुक्त सदस्यांचा निर्णय हा शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत आंदोलकांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला.

◼️सोमवारी २५ हजारांचा धडक मोर्चा
या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करताना नेत्यांनी विश्वास व्यक्त केला की, "येत्या सोमवारी कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरातील २५ हजारांहून अधिक नागरिक व दूध उत्पादक शेतकरी एकवटून भव्य मोर्चा काढणार आहेत." या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनाला ठणकावून इशारा दिला जाणार आहे.
या वेळी बावड्यातील सर्व आजी-माजी नगरसेवक, श्रीराम सेवा संस्थेचे पदाधिकारी, दूध उत्पादक शेतकरी तसेच कसबा बावडा व लाईन बाजार परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या आंदोलनामुळे गोकुळच्या वर्तुळात आणि स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes