पावनगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका फार्म हाऊसवर पोलिसांचा छापा
schedule30 Jun 24 person by visibility 544 categoryगुन्हे

पन्हाळा : वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून पावनगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका फार्महाऊसवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी ८६ हजाराच्या मुद्देमालासह तिघांना ताब्यात घेऊन चार पिडीत महिलांची सुटका करण्यात आली.
पावनगडाच्या पायथ्याशी कदमवाडी गावाच्या वाटेवरील माऊली फार्म हाऊसवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पन्हाळा पोलीस निरीक्षक महेश इंगळे आणि शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या पथकाने या फार्म हाऊसवर सापळा रचून छापा टाकला. या छाप्यात लॉजिंग एजंट फातिमा देसाई, सहाय्यक राजेंद्र कांबळे, अमृत गवड हे तीघे वेश्या व्यवसाय चालवत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानुसार या तिघांसह चार पिडीत महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या कारवाईवेळी ८६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. कारवाई नंतर एजंट फातिमा देसाई, सहाय्यक राजेंद्र कांबळे, अमृत गवड यांना अटक केली. त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास पन्हाळा पोलीस करत आहे.