+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustभाजपाच्यावतीने विजय संकल्प मोटर रॅली उत्साहात adjustशक्तिपीठ महामार्ग रद्द करावा मागणीसाठी शक्तिपीठ महामार्ग बाधित बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सोमवार 21 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात राज्यव्यापी निर्धार परिषद adjustआपट्याचे पान : वैज्ञानिक महत्व adjustराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकीची हत्या adjustकोल्हापूरचा ऐतिहासिक, गौरवशाली परंपरा असलेला दसरा सोहळा दिमाखात साजरा; श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन adjustकेंद्र शासन पुरस्कृत पीएम ई-बस सेवा प्रकल्पांतर्गत विविध पायाभूत सुविधा उभारणी कामकांजाचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते प्रारंभ adjustजिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते जुना राजवाडा कमानीस तांब्याच्या कलशाचे मंगलतोरण; हीलरायडर्स तर्फे कार्यक्रमाचे आयोजन, ३९ वे मंगल तोरण बांधण्यात आले adjustशाहूवाडी तालुक्यात धडक कारवाई : गोवा बनावटीची दारुच्या मालाची बेकायदेशीर वाहतूक करणारे ट्रकमालासह ३८ लाखाचा मुद्देमाल जप्त adjustसर्व महाविद्यालये, अधिविभागांत एकाच वेळी साजरा होणार वाचन प्रेरणा दिन; शिवाजी विद्यापीठाचे नियोजन adjust‘केआयटी’च्या सीडीसी कमिटीवर मोहन घाटगे, चंद्रशेखर डोल्ली; सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी स्विकारला पदभार
1001146600
schedule13 May 24 person by visibility 613 categoryराजकीय
कोल्हापूर : मान्सून 2024 आणि संभाव्य पूरस्थितीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या पुर्वतयारीचा आढावा सोमवारी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी घेतला. यावेळी धोकादायक इमारतीवर कारवाई करण्याच्या सूचना उपशहर अभियंता यांना दिल्या. तसेच उद्यान अधिक्षक यांनी अजूनही काही राहिलेल्या धोकादायक झाडांची यादी ट्री कमिटीची बैठक घेऊन त्याची मान्यता घ्यावी अशा सूचना दिल्या. ही बैठक महापालिकेच्या आयुक्त कार्यालयात सकाळी घेण्यात आली.

  प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी यावेळी शहरातील पूर्ण झालेल्या नाले सफाईची क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी व उपशहर अभियंता यांनी समक्ष पाहणी करुन त्याचा अहवाल द्यावा. संभाव्य पूर परिस्थितीच्या कालावधीत सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आपले फोन सुरु ठेवावेत. स्थलांतरीतांच्या निवा-याची, त्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधेची कामे पुर्ण करुन घ्या. अग्निशमन विभागाने त्यांच्याकडील सर्व साधन सामुग्रीची तपासणी करुन घ्यावी. आरोग्य विभागाने औषधाचा पूरेसा साठा करुन ठेवण्याच्या सूचना आरोग्याधिकारी यांना दिल्या. नाल्यामध्ये केलेले अतिक्रमणची नगररचना व विभागीय कार्यालय यांनी संयुक्त तपासणी करुन त्याच्यावर कारवाई करावी. शहरातील ड्रेनेज लाईनची स्वच्छता पावसाळयापुर्वी पुर्ण करावी अशा सूचना दिल्या. 

प्रारंभी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी स्लाईडशोद्वारे महापालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा घेतला. यामध्ये उपशहर अभियंता यांनी पॅचवर्कची कामे फिरत करुन किती पुर्ण व किती अपूर्ण आहेत याची माहिती सादर करावी. पावसाळयापूर्वी आवश्यक तो मुरमाचा साठा करावा. महापालिकेच्या मुख्य इमारत वॉर रुम बरोबरच विभागीय कार्यालय स्तरावर दक्षता पथके व आवश्यक कर्मचा-यांची नियुक्ती करावी. यासाठी दोन दिवसात तसे आदेश काढण्याच्या सूचना शहर अभियंता व कामगार अधिकारी यांना दिल्या. शहरातील जे चौक वारंवार पावसाळयात चोकअप होतात. त्याठिकाणी आरोग्य विभागाने स्वतंत्र स्वच्छतेसाठी पथक स्थापन करावे. सार्वजनिक शौचालय व मुतारी स्वच्छतेची मोहीम हाती घ्या. पावसाळयात डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून खाजगी जागेवरील गवत व झाडे झुडपे काढून परिसर स्वच्छ ठेवणेबाबत संबंधीत जागा मालकांना सूचना द्या. खुल्या व उघडयावर टाकलेल्या टायर जप्तीची मोहिम हाती घ्यावी अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या. शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन धोकादायक व अनाधिकृत बोर्ड इस्टेट विभागाने काढून घ्यावेत. शाळामध्ये गळती असल्यास त्याची यादी प्राथमिक शिक्षण मंडळाने तयार करुन दयावी. या शाळा तात्काळ दुरुस्त करुन घ्याव्यात अशा सूचना शहर अभियंता यांना दिल्या.

    यावेळी उप-आयुक्त साधना पाटील, पंडीत पाटील, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर अभियंता सतिश फप्पे, आर.के.पाटील, रमेश कांबळे, महादेव फुलारी, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, इस्टेट ऑफिसर विलास साळोंखे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, कामगार अधिकारी तेजश्री शिंदे, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, पाणी पट्टी अधिक्षक प्रशांत पंडत, भांडार अधिक्षक प्रिती घाटोळे, एनयूएलएमचे व्यवस्थापक निवास कोळी, रोहित सोनुले आदी उपस्थित होते.