कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले, कारवर झाड कोसळले
schedule20 May 24 person by visibility 1015 categoryराज्य
कोल्हापूर : शहर परिसरात आज, सोमवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, जोतिबा रोडवर कारवर मोठे झाड कोसळले. या दुर्घटनेत दोघे जखमी झाले. तसेच कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आगामी दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. सकाळपासूनच वातावरणात उष्मा असल्याने घामाच्या धारा वाहत होत्या. दरम्यान, दुपारी पावसाने वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाली. शहरात पाऊस झाल्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली .
दरम्यानच, जोतिबा देवाच्या दर्शनावरून येणाऱ्या भाविकांचा कारवर मोठे झाड कोसळले. यात दोघे भाविक जखमी झाले. याघटनेमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.