SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजाचा अनोखा जागरआंतरराष्ट्रीय ओव्हरडोझ जनजागृती दिन: व्यसनमुक्ती आणि संवर्धनाचा संदेशजिजाऊ बसमुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल : आमदार यड्रावकररक्षाबंधन प्रेम, श्रद्धा, समता आणि संरक्षणाची भावना दृढ करण्याचा दिवस : मुनिश्री सारस्वत सागरजी महाराजऑलिपिकवीर खाशाबा चरित्र सर्वांना नेहमी प्रेरणादायी : पै. विष्णु जोशीलकरराष्ट्रीय महामार्गावरील कागलमधील पिलरचा पूल देशात सर्वात सुंदर बनेल : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ DKTE पॉलिटेक्निकमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनी बुद्धिबळाच्या सिमलटेनियस प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसादडी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्सकै. आनंदराव जाधव सेवा संस्था ही स्वातंत्र्यसैनिकांनी लावलेली ज्योत : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादनझोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर मूलभूत सुविधाही पुरविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस;

जाहिरात

 

मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजाचा अनोखा जागर

schedule31 Aug 26 person by visibility 88 categoryसामाजिक

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत आंदोलकांनी गोंधळ घालत सरकारने मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक गोंधळाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यात आले.

मराठा आरक्षणासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही आंदोलनाला ठाम पाठिंबा देण्यात आला. सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी वसंतराव मुळीक, रुपेश पाटील, दिलीप देसाई, चंद्रकांत पाटील, प्रतिक साळुंखे, दिलीप सावंत, राहुल इंगवले, राहुल पाटील, संतोष बरगे, प्रवीण पाटील, अशोक गायकवाड, शैलजा भोसले, सुनीता पाटील, दीपा डोणे, उषा तोरस्कर, पद्मजा पोवार, अनुराधा पाटील, वनिता निंबाळकर, सर्वदा हरणे, सरपंच कुमार कोराणे, सूर्यमान इंगळे, कृष्णात माने, सात्विक मोहिते, चैतन्य जाधव, महादेव जाधव, सुनील चव्हाण, शिवराज गावडे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes