कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : 'आप'ने जाहीर केली पहिली यादी, इंजिनियर, डॉक्टर ते कामगारांचा समावेश
schedule27 Dec 25 person by visibility 108 categoryराजकीय
कोल्हापूर : आम आदमी पार्टीने महापालिका निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली. सात जणांच्या यादीमध्ये इंजिनियर, डॉक्टर, खुदाई कामगार, टू-व्हिलर मेकॅनिक, शाहीर ते खुदाई कामगार अशा सर्व घटकातील उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.
ही यादी म्हणजे कार्यकर्ता पॅटर्न ची नांदी असल्याचे आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले.
राष्ट्रवादी शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टीने एकत्र येऊन तयार झालेल्या राजर्षी शाहू आघाडीतुन हे उमेदवार आप च्या माध्यमातून लढणार असल्याचे आप शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी सांगितले.





