संजय घोडावत विद्यापीठात “विकसित भारतासाठी तंत्रज्ञानांचा संगम” आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी
schedule27 Dec 25 person by visibility 100 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे दि. १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी “विकसित भारतासाठी तंत्रज्ञानांचा संगम” या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला देशातील संशोधक, प्राध्यापक, उद्योगतज्ज्ञ तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. परिषदेचे मुख्य वक्ते भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी बॉम्बे) येथील प्रख्यात तज्ज्ञ डॉ. सीबी राज बी.पल्लई हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून आधुनिक तंत्रज्ञानातील नव्या घडामोडी, संशोधनातील उदयोन्मुख प्रवाह तसेच उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील परस्पर सहकार्याच्या संधी यावर सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते. परिषदेसाठी 101 रिसर्च पेपर प्राप्त झाले.त्यापैकी 57 पेपरची तज्ञाकडून समालोचन करून सादरीकरणा साठी निवड झाली. पुढील पिढीतील संगणकीय जाळे व सेमीकंडक्टर तंत्रज्ञान, बुद्धिमान संगणन प्रणाली, डेटा सायन्स व सायबर सुरक्षा, रोबोटिक्स, स्वयंचलन आणि ड्रोन तंत्रज्ञान, मल्टिमीडिया सिग्नल प्रोसेसिंग अशा विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. परिषदेचे संयोजन प्रा. डॉ. शामला महाडिक यांनी केले असून आयोजन समितीत प्रा. डॉ. स्वप्निल हिरीकुडे, प्रा. डॉ. दीपिका पाटील, प्रा.डॉ. चेतन आरगे, प्रा. गुरुनाथ मच्छले, प्रा.समीर तांबोळी, प्रा.अमरीश पाटील आणि प्रा.स्वाती पाटील यांचा सक्रिय सहभाग होता. या परिषदेच्या माध्यमातून संशोधन कार्याला नवी दिशा मिळून शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. समारोपप्रसंगी सहभागी संशोधक, वक्ते आणि स्वयंसेवकांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.स्वाती पाटील, सूत्रसंचालन प्रा. गुरुनाथ मच्छले, प्रा. ईश्वरी भोसले, प्रा. सृष्टी पाटील, आभार प्रदर्शन प्रा.अमरीश पाटील, प्रा.समीर तांबोळी यांनी मानले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेला संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले.





