SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बारावीची ८ तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरुस्वागत मंडपाच्या मुद्द्यावरून पोलिस प्रशासनाला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा विरोध; आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांची प्रतिक्रियाविधानपरिषदेच्या ५ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर; २३ ऑक्टोबरला मतदान, तर २७ ऑक्टोबरला निकाल!गणेशभक्तीच्या गजरात सामाजिक एकात्मतेचा संदेश; बाबू जमाल तालमीच्या वतीने भव्य अथर्वशीर्ष पठणजागतिक गेंडा दिन: संरक्षण आणि संवर्धनाची निकडबालकांनी सोशल मीडियाचा वापर टाळावा : सहायक पोलीस निरीक्षक स्वाती यादवज्युनिअर एशियन हॉकी विजेत्या सानिका माने हिचा सत्कारवन हक्क दावे तातडीने निकाली काढा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर गोकुळ निवडणुकीत महायुती म्हणूनच लढणार; ८ ऑक्टोबरला माघारीच्या दिवशी पॅनेल जाहीर होणार : मंत्री हसन मुश्रीफमानवतेचे सोने! हरवलेले सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत करणाऱ्या कोल्हापूरच्या सफाई दूतांचा आश्किन आजरेकर यांच्या हस्ते गौरव

जाहिरात

 

स्वागत मंडपाच्या मुद्द्यावरून पोलिस प्रशासनाला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा विरोध; आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांची प्रतिक्रिया

schedule22 Sep 26 person by visibility 108 categoryसामाजिक

कोल्हापूर  : बिनखांबी गणेश मंदिर ते गंगावेश चौक या मार्गावर कोणत्याही संघटनेस किंवा राजकीय पक्षास स्वागत मंडप घालू देऊ नये, असे निर्देश लक्ष्मीपुरी व जुना राजवाडा पोलीस स्टेशनने महापालिकेला दिले आहेत. या निर्णयाच्या विरोधात आज मंगळवारी सकाळी   जुना बुधवार पेठ येथील डीवायएसपी कार्यालयात शहर डीवायएसपी प्रिया पाटील यांची भेट घेऊन सर्वपक्षीय कार्यकर्ते चर्चा केली. बैठकीमध्ये उद्यापर्यंत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या संपूर्ण प्रकरणाबाबत आम आदमी पक्षाचे (आप) प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले पोलीस प्रशासनाने कोल्हापूर महानगरपालिकेला पत्र देऊन मिरवणूक मार्गावर आणि विशेषतः महाद्वार रोड आणि गंगावेश या मार्गावर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही पक्ष किंवा संघटनेला मंडप घालण्यास परवानगी देऊ नये, अशा पद्धतीचे पत्र काढले आहे. यावर जाब विचारण्यासाठी आज आम्ही पोलीस कार्यालयात आलो होतो.


पोलिसांच्या काही शंका होत्या किंवा त्यांच्यापर्यंत काही चुकीच्या पद्धतीने माहिती पोहोचवण्यात आली होती. मंडप टाकल्यामुळे मिरवणूक रेंगाळते, चंग्राचेंगरी वाढते, गर्दी वाढते आणि विस्कळीतपणा येतो, असा पोलिसांचा समज आहे. मात्र, अशा पद्धतीचा कोणताही प्रकार आजपर्यंत कोल्हापूरमध्ये झालेला नाही. सर्वच पक्ष चांगल्या भावनेने आणि एकोपाच्या भावनेने गर्दीवर सातत्याने सूचना करत असतात की, चालत राहावे, गर्दी करू नये.
प्रत्येक पक्षाच्या मंडपातून पक्षाच्या पदाधिकाऱ्याला आदराने बोलावले जाते आणि अत्यंत सन्मानाने त्याला मानपान दिला जातो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त एक ते सव्वा मिनिटाचा कालावधी लागतो, ज्यामुळे मिरवणूक रेंगाळण्याशी याचा काहीही संबंध राहत नाही. जर पोलिस प्रशासनाने दिलेल्या १० ते २० मिनिटांच्या वेळेनुसार काम केले, तर कोल्हापूरमध्ये गर्दी होण्याची शक्यता अजिबात राहणार नाही.

या सर्व गोष्टींवर मॅडम सकारात्मक चर्चा करून योग्य तोडगा काढतील अशी आम्हाला आशा आहे. तसेच, लवकरच सर्व पक्ष, सर्व संघटना, महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत सकारात्मक निर्णय होऊन मंडपाला परवानगी मिळेल, असा विश्वास यावेळी संदीप देसाई यांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes