डीकेटीईच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्नीकमध्ये एआयएमएल व मेकॅट्रॉनिक्स पदविका अभ्यासक्रमांना एआयसीटीई, दिल्लीकडून मान्यता; दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांस सुवर्णसंधी
schedule07 May 25 person by visibility 233 categoryदेश

इचलकरंजी : डीकेटीईच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्नीकला एआयसीटीई, दिल्ली यांचेकडून डिप्लोमा इन एआयएमएल व डिप्लोमा इन मेकॅट्रानिक्स या ३ वर्षाच्या अभ्यासक्रमांना मान्यता मिळालेली आहे. वायसीपी मध्ये सन २०२५-२६ पासून या अभ्यासक्रमांचा शुभारंभ होत आहे. दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या कोर्सेसना प्रवेश घेवू शकतात. या कोर्सची विद्यार्थी क्षमता ६० असून दहावी चा निकाल लागल्यानंतर डीटीईचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर कॅप राउंडद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो अशी माहिती संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, सध्याच्या डिजीटल युगात ए.आय. क्षेत्रातील आवश्यक असणा-या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेवून, एआयएमएल व मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींग ही काळाची गरज असल्याने तसेच संगणक क्षेत्रामध्ये या दोन्ही कोर्स चे महत्वाचे योगदान असल्याने या दोन्हीं अभ्यासक्रमासाठी पालकांच्या व विद्यार्थ्यांच्यातून होत असलेल्या मागणीनुसार संस्थेने एआयसीटीई कडे मागणी केली होती. या कोर्सेसमुळे इचलकरंजी व आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण डिप्लोमा संपादन करण्याची संधी प्राप्त झाली आहे. वायसीपीमध्ये नव्याने सुरु होणा-या २ पदविका अभ्यासक्रम शिकविण्यासाठी खास तज्ञ प्राध्यापक असून येथे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना या प्राध्यापकाचा लाभ होणार असल्याचे सांगितले. तसेच या ठिकाणी अद्यायावत अशा ‘ऍडव्हॉन्सड रिसर्च लॅब’ ची सोयही आहे. त्यामुळे येथे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणांची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
एआयएमएल म्हणजे मानवी बुध्दिमत्तेसारखी अनुभवातून शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये व त्या चालवण्या-या सॉफटवेअर प्रोग्रॅम्समध्ये आणणे. एआयएमएल ही संगणक अभियांत्रिकीचीच एक शाखा असून प्रगत अग्लोरिदम आणि प्रोग्रामिंगवर लक्ष केंद्रीत करुन निर्माण झालेली शाखा आहे. या शाखेमध्ये मशीन लर्निंग, डीप लर्निंग, डेटा सायन्स, नैसर्गिक भाषा, आयओटी या गोष्टींचा अंतर्भाव आहे. ए.आय. चा वापर हा सगळयाच क्षेत्रात होत असल्यामुळे एआयमुळे नविन अभियांत्यांना रिसर्च व रोजगाराची नवी संधी प्राप्त होणार आहे.
मेकॅट्रॉनिक्स या शाखेमध्ये यांत्रिक, विद्युत इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक यासारख्या विविध क्षेत्राचा समावेश आहे. मेकॅट्रॉनिक्स तज्ञ हे ऑटोमोटिव्ह नियंत्रण प्रणाली, डेटा लॉगिंग सॉफटवेअर इ. पदावर अभियंता म्हणून काम करु शकतात.
वायसीपीमध्ये शिकविण्यात येणा-या कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रीकल, इऍण्डटीसी, सिव्हील व मेकॅनिकल या कोर्सना एनबीए चे मानांकन असून तज्ञ प्राध्यापक वर्ग, कॉम्पुटरच्या अत्याधुनिक लॅबज, सॉफटवेअर, वर्कशॉप व सुसज्ज ग्रंथालय याचा लाभ प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना होणार आहे. वायसीपीने स्थापनेपासूनच १०० टक्के प्लेसमेंट आणि उत्कृष्ट निकालाची परंपरा जोपासली आहे. देश विदेशातील अनेक नामांकित कंपनीत विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत आहेत याशिवाय फॉरेन प्लेसमेंट देण्यामध्ये देखील संस्था अघाडीवर आहे असे वायसीपीचे प्राचार्य ए.पी.कोथळी यांनी यावेळी नमूद केले.
सदर कोर्सेस मिळण्यासाठी डिकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी, संचालिका, डॉ.एल.एस. अडमुठे यांचे मार्गदर्शन लाभले. तर सदर पत्रकार परिषदेस , प्राचार्य ए.पी.कोथळी, उपप्राचार्य बी.ए.टारे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.