SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये 31 घरांमध्ये डेंग्यु आढळलेकोल्हापूर : पर्ल हॉटेल समोरील अनधिकृत फुलवाले केबिनवर अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत कारवाईकोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यासाठी जीआय नोंदणी करा : डॉ. सुभाष घुलेकोल्हापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा; राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचनाडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणीडी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार : डॉ. संजय डी. पाटील; विद्यापीठाचा पाचवा स्थापना दिवस उत्साहात साजराडी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ''राष्ट्रीय डॉक्टर डे' उत्साहात; कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून शुभेच्छाशक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारु नका : सतेज पाटील विधानपरिषदेत कडाडले जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी 7 जुलै रोजीविमा योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार ; सतेज पाटील यांचा सवाल : महिन्याच्या आत कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन

जाहिरात

 

जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी 7 जुलै रोजी

schedule01 Jul 25 person by visibility 189 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवार दिनांक 7 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय, निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारींबाबत न्याय मिळण्यासाठी स्वत: उपस्थित राहून अर्ज सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.

तालुका स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका स्तर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार, विभागीय आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार व मंत्रालय स्तरावर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार याप्रमाणे आयोजित करण्यात येतो.

अर्ज स्वीकृतीचे निकष याप्रमाणे-
अर्ज विहित नमुन्यात असावा (नमुना प्रपत्र 1 अ ते 1 ड), तक्रार /निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, चारही स्तरावरील लोकशाही दिनाकरिता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठविणे आवश्यक राहिल. तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनात अर्ज करता येईल, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी विभागीय आयुक्त लोकशाही दिनात व विभागीय आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यानी मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज करता येईल.

चारही स्तरावरील लोकशाही दिनात खालील बाबींशी संबंधित अर्ज स्विकारले जाणार नाहीत. -
न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर अशा प्रकारचे अर्ज लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत.

लोकशाही दिनापूर्वी 15 दिवस अगोदर विहीत नमुन्यात करमणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आपले तक्रार अर्ज करावेत, असेही पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes