SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यात सलग १७ तास रिक्षा बंद; प्रवाशांची गैरसोय, विविध ठिकाणी निदर्शनेखेबवड्यातील वर्षानुवर्षे बंद असलेला हातपंप पुन्हा सुरू; सागर भोगम यांच्या पाठपुराव्याला यशयुवाशक्ती फाऊंडेशनच्या भव्य नोकरी मेळाव्यात ५०० युवकांना रोजगाराची सुवर्णसंधी; सागर भोगम यांच्याकडून आयोजकांचे कौतुकसहकाररत्न शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांना मान्यवरांकडून अभिवादनकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हशींसह गाय खरेदीसाठीही देणार कर्ज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हशींसह गाय खरेदीसाठीही देणार कर्ज मुख्यमंत्री ग्राम सडक व हॅम योजनेअंतर्गत सुरू असलेली रस्त्यांची कामे जानेवारी अखेर पूर्ण करा : मंत्री हसन मुश्रीफआयटीआयमधून प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरात उद्यमनगरीचा पाया रचणार्‍या म्हादबा मिस्त्री यांचा आदर्श ठेवावा, खासदार धनंजय महाडिक यांचं आवाहनडी.वाय.पाटील मेडीकल कॉलेजला विजेतेपदकामे न करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा : आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांचे निर्देश

जाहिरात

 

प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी शिवाजी विद्यापीठाचा कार्यभार स्वीकारला

schedule11 Oct 25 person by visibility 588 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : सुसंवाद, विश्वास आणि पारदर्शकता या मूल्यांवर आधारित कार्य करून शिवाजी विद्यापीठाचा लौकिक वृद्धिंगत करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू या, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी आज येथे केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असलेल्या डॉ. गोसावी यांनी आज सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी उपस्थित अधिकार मंडळांचे सदस्य, शिक्षक आणि अधिकारी यांना संबोधित करताना ते बोलत होते. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लगेच कामकाजाला सुरवात केली.

कुलगुरू डॉ. गोसावी यांनी आज सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करून मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कुलगुरू दालनामध्ये प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी सौ. अर्चना गोसावी याही उपस्थित होत्या.

कार्यभार स्वीकारल्यानंतर कुलगुरू डॉ. गोसावी यांचे विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने व्यवस्थापन परिषद सभागृहात औपचारिक स्वागत करण्यात आले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथभेट देऊन कुलगुरूंचे सपत्नीक स्वागत करण्यात आले.

यानंतर उपस्थितांना संबोधित करताना कुलगुरू डॉ. गोसावी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव लाभलेल्या आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारकार्याचा वारसा लाभलेल्या हीरकमहोत्सवी शिवाजी विद्यापीठाचा प्रभारी कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी लाभली, याबद्दल अतिशय आनंद वाटत आहे. ही संधी दिल्याबद्दल कुलपती महोदयांचे आभार मानतो. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा प्रभारी कुलगुरू म्हणून काम करण्याची संधीही मला लाभली होती. त्यामुळे फुले, आंबेडकर आणि शाहू या त्रयींच्या संगमावर काम करता आले, याचे समाधानही वाटते. शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला लौकिक प्रस्थापित केला आहे. हा लौकिक वृद्धिंगत करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू या, असे आवाहन त्यांनी केले.

यानंतर कुलगुरू डॉ. गोसावी यांनी आपल्या दालनात जाऊन लगेचच कामकाजाला सुरवात केली. कार्यालयात आलेल्या विविध विभागांच्या नस्ती पाहून त्या मार्गी लावल्या. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या पूर्वनियोजित ऑनलाईन बैठकीमध्ये येथूनच सहभागी होऊन मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, संगणक केंद्र संचालक अभिजीत रेडेकर, माजी अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. मेघा गुळवणी, व्यवस्थापन परिषद सदस्य स्वागत परुळेकर, डॉ. मंजिरी मोरे, अधिसभा सदस्य धैर्यशील यादव, डॉ. निखिल गायकवाड, डॉ. सुभाष कोंबडे, डॉ. किरण कुमार शर्मा, डॉ. राहुल माने, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे, पुणे विद्यापीठाचे उपकुलसचिव प्रदीप कोळी आणि सुरेश भोसले आदी उपस्थित होते.

▪️दरम्यान, कार्यालयीन कामकाज उरकल्यानंतर सायंकाळच्या सत्रात प्रभारी कुलगुरू डॉ. गोसावी यांनी सपत्नीक श्री अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर बिंदू चौक येथील हुतात्मा स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्प वाहून अभिवादन केले. तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळ्यासही पुष्प वाहून अभिवादन केले. राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त केली. दसरा चौक येथेही छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले. त्यानंतर कावळा नाका येथील करवीर राज्य संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्यासही पुष्प वाहून त्यांनी अभिवादन केले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes