SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'गोल्ड हंटर्स गँग'वर मोक्का अंतर्गत कारवाई; जुना राजवाडा पोलिसांची मोठी कारवाईकल्पनेपासून उद्योगापर्यंत: केआयटी-आयआरएफच्या कार्यशाळेत नवउद्योजकांना मिळाला यशाचा मूलमंत्र!भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेचं झाले मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीमध्ये रूपांतर६६७ दूध संस्थांच्या मतदान पात्रतेवर उच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब; 'गोकुळ'च्या सत्ताधाऱ्यांकडून गडहिंग्लजमध्ये आनंदोत्सवकोल्हापुरात शुक्रवारी, शनिवारी दिनमान साहित्य उत्सवाचे आयोजन राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन: काळाची गरजपर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून कसबा बावडा येथील ७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणीनदी पुनर्जीवन प्राधिकरणामार्फत कोल्हापूर महानगरपालिकेला निधी उपलब्ध करून देण्यात यावा : भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव १ कोटींहून अधिक किमतीचे ४०० हरवलेले मोबाईल नागरिकांच्या हातात; कोल्हापूर सायबर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!३ वर्ष ९ महिने पोलिसांना गुंगारा देणारा 'ए एस ट्रेडर्स'चा मुख्य एजंट अखेर जेरबंद!

जाहिरात

 

कोल्हापुरात 'गोल्ड हंटर्स गँग'वर मोक्का अंतर्गत कारवाई; जुना राजवाडा पोलिसांची मोठी कारवाई

schedule04 Sep 26 person by visibility 127 category

कोल्हापूर: कोल्हापूर शहर व परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिक व महिलांना टार्गेट करून दुचाकीवरून सोनसाखळी हिसकावणाऱ्या आंतरजिल्हा संघटित 'गोल्ड हंटर्स गँग'विरुद्ध पोलिसांनी अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात टोळीप्रमुख वैभव नारायणराव आडोळे व साथीदार करण गोरख जगधणे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) १९९९ चे कलम ३(१)(ii), ३(२) व ३(४) अन्वये कलमवाढ करण्यास विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र रंजन कुमार शर्मा यांनी मंजुरी दिली आहे.


जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून ११ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास इस्कॉन मंदिर ते अंबाई टैंक रोडवर फिर्यादी महिला भाजी खरेदी करून घरी जात असताना ही घटना घडली. काळ्या रंगाच्या यामाहा दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून फिर्यादीच्या गळ्यातील २,००,००० रुपये किमतीचे २०.२३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र बळाने जबरदस्तीने हिसकावून नेले होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) कोल्हापूरच्या पथकाने समांतर तपास करून गोपनीय बातमीदार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शिरवळ (जि. सातारा) येथे सापळा रचून आरोपींना अटक केली.

 * टोळीप्रमुख: वैभव नारायणराव आडोळे (वय २६, मूळ रा. येरला, ता. मोर्शी, जि. अमरावती; सध्या रा. हिंजवडी, पुणे).
 * टोळी सदस्य: करण गोरख जगधणे (वय १९, मूळ रा. पिंपळवाडी पिराची, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर; सध्या रा. औंध गावठाण, पुणे).

 या टोळीविरुद्ध महाराष्ट्रात जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी व शरीराविरुद्धचे एकूण २८ गंभीर गुन्हे दाखल असून त्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा, बुलढाणा, बीड, अकोला, अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये गुन्हे केले आहेत.

 गुन्ह्यापूर्वी नवीन बांधकाम साईट्स व सीसीटीव्ही कव्हरेजची पाहणी करून पायी जाणाऱ्या वृद्ध महिलांवर पाळत ठेवणे आणि पोलिसांना चकवा देण्यासाठी इतर जिल्ह्यातून चोरी केलेली दुचाकी वापरणे ही यांची मोडस ऑपरेंडी होती.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. 

आगामी गणेशोत्सव व सण उत्सवांच्या कालावधीत नागरिकांनी अनोळखी व्यक्तींबाबत सतर्क राहावे व संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, तसेच जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी व भूखंड माफियांविरुद्ध अशीच कठोर मोहीम सुरू राहील, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes