SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक गेंडा दिन: संरक्षण आणि संवर्धनाची निकडबालकांनी सोशल मीडियाचा वापर टाळावा : सहायक पोलीस निरीक्षक स्वाती यादवज्युनिअर एशियन हॉकी विजेत्या सानिका माने हिचा सत्कारवन हक्क दावे तातडीने निकाली काढा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर गोकुळ निवडणुकीत महायुती म्हणूनच लढणार; ८ ऑक्टोबरला माघारीच्या दिवशी पॅनेल जाहीर होणार : मंत्री हसन मुश्रीफमानवतेचे सोने! हरवलेले सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत करणाऱ्या कोल्हापूरच्या सफाई दूतांचा आश्किन आजरेकर यांच्या हस्ते गौरवडॉ. डी. वाय. पाटील कृषी संकुलच्या मुलींचा संघ पाचव्यांदा विजेताभविष्यातील तंत्रज्ञान सहकार्यासाठी केआयटी यु.डब्ल्यू.ए.चा ‘मेजर स्ट्रॅटेजिक पार्टनर’: डॉ.चकमासंगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह १ ऑक्टोबरपासून सुरू करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूडEMSA INSPIRE 2026 : महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षक सन्मान व पुरस्कार सोहळा २४ सप्टेंबर रोजी

जाहिरात

 

भाजप उद्योग आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण; उद्योगवृद्धीसाठी प्रभावी काम करण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

schedule03 Aug 26 person by visibility 500 categoryराजकीय

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना खासदार धनंजय महाडिक, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत', 'मेक इन इंडिया' आणि 'स्टार्टअप इंडिया' या संकल्पनांना गती देण्यासाठी उद्योग क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कोल्हापूर हा पारंपरिक उद्योग, अभियांत्रिकी, फाउंड्री, वस्त्रोद्योग आणि कृषीपूरक उद्योगांसाठी ओळखला जाणारा जिल्हा असून नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे, नवीन स्टार्टअप्स उभारण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आणि उद्योगांच्या विविध समस्या शासन स्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी भाजप उद्योग आघाडीने समन्वयकाची भूमिका पार पाडावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केंद्र व राज्य शासनाच्या विविध उद्योगाभिमुख योजनांचा लाभ अधिकाधिक उद्योजकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

नवीन कार्यकारिणीमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून भरत पाटील, कोल्हापूर शहरप्रमुख धैर्यशील पाटील, शहर कार्याध्यक्ष समरजित निंबाळकर, जिल्हा महिला आघाडी प्रमुख दीपा माने, शहर महिला आघाडी प्रमुख सीमा शहा, इचलकरंजी महिला आघाडी प्रमुख कविता माने, कागल तालुका अध्यक्ष रोहन साबळे, करवीर तालुका अध्यक्ष अशोक काटकर, शाहुवाडी तालुका अध्यक्ष बी. एस. पाटील, भुदरगड तालुका अध्यक्ष सतीश जाधव, राधानगरी तालुका अध्यक्ष अनिल कातिवले, हातकणंगले तालुका अध्यक्ष मधुकर पाटील, पन्हाळा तालुका अध्यक्ष मंदार पाटील, शिरोळ तालुका अध्यक्ष देवराज सुतार, आजरा तालुका अध्यक्ष निखिल पाटील, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष पृथ्वीराज तारळे, चंदगड तालुका अध्यक्ष पी. टी. पाटील आणि गगनबावडा तालुका अध्यक्ष सुरेश लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच शहर महिला आघाडी उपाध्यक्षा अश्विनी पाटील आणि जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्षा वेदा गांधी यांनाही नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, विशाल शिराळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes