SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह १ ऑक्टोबरपासून सुरू करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूडEMSA INSPIRE 2026 : महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षक सन्मान व पुरस्कार सोहळा २४ सप्टेंबर रोजीआंतरराष्ट्रीय शांतता दिन: महत्त्व आणि आजच्या काळाची गरजकचऱ्यात सापडलेले दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत करणाऱ्या कोल्हापूर महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कारई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन ही काळाची गरज : हिमांशू लेलेकोल्हापूर : इराणी खण येथे 60,352 गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती घ्या; योजनांचा लाभ घेऊन पशुपालन व्यवसायाला चालना द्या : पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. दीपाली भुतकरसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ११ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट : अध्यक्ष नवीद मुश्रीफआंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा दिन: महत्त्व आणि उद्दिष्टकोल्हापुरात गौरी-गणपती विसर्जन: पर्यावरणपूरक उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद

जाहिरात

 

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह १ ऑक्टोबरपासून सुरू करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड

schedule21 Sep 26 person by visibility 91 categoryमहानगरपालिका

🔲 २४ सप्टेंबरपासून ऑनलाइन बुकिंग; बाह्य कामे महिनाअखेर पूर्ण करण्याचे निर्देश

 

कोल्हापूर  : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह दि. १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी आज दिल्या. नाट्यगृहाचे ऑनलाइन बुकिंग दि. २४ सप्टेंबर २०२६ पासून सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

 

नाट्यगृह सुरू करण्यासाठी बाहेरील प्रलंबित कामे दि. ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावीत. नाट्यगृहासाठी आवश्यक ट्रान्सफॉर्मर पाच दिवसांत बसवून कार्यान्वित करावा. खासबाग परिसर व नाट्यगृहाच्या बाहेरील सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करावीत. 

 

तसेच नाट्यगृहाच्या देखभालीसाठीची एजन्सी याच आठवड्यात निश्चित करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. नाट्यगृहाच्या बुकिंगसाठी सर्वानुमते निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार पुढील बुकिंग प्रक्रिया राबविण्यात यावी असेही त्यांनी स्पष्ट केले.

विसर्जन व्यवस्थेतील निष्काळजीपणाबद्दल ठेकेदारावर कारवाई

घरगुती गौरी-गणपती विसर्जनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदारामार्फत शहरातील गणेशमूर्ती संकलनासाठी आवश्यक गाड्या व हमालांची व्यवस्था अपेक्षेप्रमाणे करण्यात आली नाही. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे महापालिका प्रशासनाला नागरिक तसेच लोकप्रतिनिधींच्या रोषाला सामोरे जावे लागले. ही बाब गंभीर असून संबंधित ठेकेदारास आजच कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी वर्कशॉप विभागास दिल्या. अनंत चतुर्दशीच्या दिवशी अशा प्रकारचा गोंधळ पुन्हा होऊ नये यासाठी आवश्यकतेनुसार नव्याने ठेकेदार नियुक्त करण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 

बैठकीस उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

आजच्या आढावा बैठकीस वेळेवर उपस्थित न राहिलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांना दिल्या.

 महापालिकेच्या महत्त्वाच्या कामांच्या आढावा बैठकीस संबंधित अधिकाऱ्यांची वेळेवर उपस्थिती व जबाबदारी निश्चित असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विविध विकासकामांनाही गती देण्याचे निर्देश

याचबरोबर गोकुळ हॉटेल परिसरातील मल्टीलेव्हल कार पार्किंगच्या निविदेची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून निविदा निश्चित करावी. हलसवडे येथील डॉग शेल्टरचे काम याच आठवड्यात सुरू करावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुसार कायदेशीर करण्याच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. ही कार्यवाही ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवावे अशा सूचना सर्व सहायक आयुक्तांना देण्यात आल्या. वॉटर ऑडिटच्या निविदेला याच आठवड्यात मंजुरी मिळण्याची अपेक्षा असून मंजुरी मिळताच ऑडिटचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाई नियमितपणे सुरू ठेवावी. कारवाई दरम्यान कोणी अडथळा निर्माण करून विरोध केल्यास नियमानुसार तत्काळ गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही करावी अशा सूचनाही अतिक्रमण विभागप्रमुखांना देण्यात आल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, नागेंद्र मुतकेकर, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ. विजय पाटील, संजय सरनाईक, राम काटकर, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव दिवाकर कारंडे, उपशहर रचनाकार महादेव फुलारी, पद्मल पाटील, उपशहर अभियंता सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, विद्युत अभियंता नारायण पुजारी, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंह राजपूत, रवका अधिकारी सुनील बिद्रे आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes