SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ बुधवारी प्रख्यात संशोधक डॉ. जी. सतीश रेड्डी प्रमुख पाहुणेमतमोजणीत पारदर्शकता आणि अचूकता ठेवा : जिल्हाधिकारी अमोल येडगेजानेवारीत विद्यापीठात स्पार्क फिल्म फेस्टिव्हलइतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहनडिजिटल युग हे जीवनाचा अविभाज्य भाग : डॉ. सागर डेळेकरपरिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल ॲप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहनप्राचीन ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत भारताला ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्दसंविधान जनजागृती प्रश्नमंजुषाचे आयोजनक्रीडा स्पर्धेतून नवनवीन कौशल्ये आत्मसात करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे

जाहिरात

 

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल ॲप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

schedule19 Dec 25 person by visibility 58 categoryराज्य

कोल्हापूर : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन इत्यादी सेवांशी संबंधित बनावट वेबसाइट्स, फसवे मोबाईल अॅप्स (APKs), तसेच मोबाईल SMS/WhatsApp द्वारे पाठविल्या जाणाऱ्या खोट्या लिंक मोठ्या प्रमाणात नागरिकांना फसवत आहेत. यामुळे सर्व वाहन चालक, मालक यांची आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीची चोरी तसेच नागरिकांच्या ओळखीचा गैरवापर होत असल्याचे आढळून आले आहे. सर्व वाहन चालक, मालक यांनी परिवहन विभागाच्या अधिकृत शासकीय संकेतस्थळांचा वापर करावा, असे आवाहन सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.

अधिकृत शासकीय संकेतस्थळ पुढीलप्रमाणे-
वाहन नोंदणी सेवा (VAHAN) - https://vahan parivahan.gov.in, ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI) - https://sarathi.panvahan.gov.in, परिवहन सेवा - https://www.parivahan.gov.in, ई-चलन पोर्टल - https://echallan parivahan.gov.in
वरील सर्व अधिकृत संकेतस्थळे ".gov.in" ने समाप्त होतात. ".com", "online", "site", "in" अशा डोमेनवरील कोणत्याही वेबसाइ नागरिकांनी उघडू नयेत. 

आपल्या वाहनाचे चलन बाकी असून त्वरित दंड भरण्याची धमकी देण्यात येते व अनधिकृत लिंक पाठविण्यात येऊन त्वरित दंड भरण्याचे संदेश प्राप्त होतात. "DL (वाहन चालविण्याचा परवाना) सस्पेंड होणार आहे. त्वरित तपासणी करा." RTO कार्यालय किंवा परिवहन विभागाकडून नागरिकांच्या मोबाईलमध्ये कधीही WhatsApp द्वारे पेमेंट लिंक पाठविली जात नाही, याची नोंद घ्यावी, असे संदेश फसवणूक करणाऱ्यांकडून पाठविले जातात. 

RTO Services.apk", "mParivahan Update.apk", "eChallan Pay.apk" अशा अनधिकृत APK ॲप्स चोरीला जाण्याची शक्यता असते. नागरिकांनी कोणताही संशयास्पद संदेश/लिंक प्राप्त झाल्यास तात्काळ National Cyber Crime Portal-https://www.cybercrime.gov.in तसेच सायबर फसवणूक हेल्पलाइन - १९३०  किंवा जवळचे जिल्हा सायबरर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes