कोल्हापूर जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द
schedule19 Dec 25 person by visibility 50 categoryराज्य
कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 जिल्ह्यांतील महानगरपालिकांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून दिनांक 15 डिसेंबरपासून राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
यामुळे माहे जानेवारी 2026 मध्ये होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी दिली.





