SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
असाही एक . . . आगळा वेगळा शाही विवाह सोहळा'आरोग्याच्या सवयी बालपणातच दृढ होतात' : स्वच्छता निरीक्षक स्वप्निल उलपे यांचे प्रतिपादनकामगारांच्या कष्टांवर महाराष्ट्राचे वैभव : मंत्री मंगलप्रभात लोढास्वगणना मोहिमेस 1 मे पासून प्रारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती यांनी नोंदविला आपला सहभागराज्याच्या विकासात कोल्हापूरला प्रगतीपथावर नेऊया : पालकमंत्री प्रकाश आबिटकरबारावीचा निकाल उद्या जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार गुणस्वराज्य भवन (जिल्हाधिकारी कार्यालय) येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहणकळंबा ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; सरपंच सुमन गुरव यांच्या हस्ते ध्वजपूजन, तर प्रकाश खडके यांच्या हस्ते ध्वजारोहणमहाराष्ट्र दिनानिमित्त कोल्हापूर महापालिकेत ध्वजारोहण उत्साहात कामगार दिन : श्रमिकांच्या घामाचा आणि संघर्षाचा सन्मान

जाहिरात

 

भाजप सरकारने महिलांना स्वावलंबी करून सक्षम बनवले : खासदार धनंजय महाडिक

schedule30 Nov 25 person by visibility 332 categoryराजकीय

▪️मुरगूड नगरपरिषद निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन

कोल्हापूर  : भाजप सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. तसेच मुरगूड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीच्या आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. मुरगूड येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

कागल तालुयातील मुरगुडमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीच्या आघाडीच्या उमेदवारांची जाहीर सभा झाली. सभेला मोठ्या संख्येने मतदारांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. तर भाजप सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली असून, विकास हाच राज्यातील भाजप सरकारचा प्रमुख अजेंडा आहे. मुरगूडमधील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, शहर सौंदर्यीकरण याच्यासह सर्वांगीण विकासाला गती देणार आहोत. त्यामुळे मुरगूड शहराच्या विकासाची चिंता करण्याचे काहीच कारण नाही, असे खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले.

 यावेळी भाजपाचे नेते प्रवीणसिंह पाटील, सुहासिनी पाटील, आघाडीचे नेते वीरेंद्र मंडलिक, महेश जाधव, नामदेवराव मेंडके, प्रकाश गोधडे, दिग्विजय पाटील, जयसिंग भोसले, भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes