SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मनपाडळे ल.पा. तलावातून शेतीसाठी पाणी उपशास बंदीकरवीर व कागल तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; आमदार सतेज पाटील यांची मागणीराऊत हे राज्याचे मुक्त विद्यापीठ, त्यांनी आमच्या पक्षात नाक खुपसू नये; मंत्री मुश्रीफांचा घणाघातकागल व गडहिंग्लज तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रयत्नशील : मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरणदुष्काळी यादीत वंचित तालुक्यांचा समावेश करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू : आमदार सतेज पाटील यांचा इशाराडीकेटीईमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्त ‘स्वरदीपोत्सव- मराठी गीतांचा‘ कार्यक्रम उत्साहात जागतिक न्यूमोनिया दिन: आरोग्याची काळजी आणि जनजागृतीची गरजराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये बारामतीच्या खेळाडूंची दैदीप्यमान कामगिरी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून खेळाडूंचा गौरवभगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजनगुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन या समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’चा अंतिम आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

जाहिरात

 

मनपाडळे ल.पा. तलावातून शेतीसाठी पाणी उपशास बंदी

schedule12 Nov 26 person by visibility 80 categoryराज्य

◼️पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी विविध टप्प्यांत उपसाबंदी; ६ मार्च २०२७ पासून पुढील आदेशापर्यंत बंदी

कोल्हापूर : राज्यातील पर्जन्यमानातील घट, अल-निनोचा संभाव्य प्रभाव आणि दुष्काळसदृश परिस्थितीची शक्यता लक्षात घेता उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर व नियोजनबद्ध व्यवस्थापन करून पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी मनपाडळे लघु पाटबंधारे तलावाच्या जलाशयातून शेतीसाठी पाणी उपसा करण्यास विविध टप्प्यांत बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंतच्या जलसाठा व्यवस्थापनाच्या दृष्टीने लागू करण्यात येत असल्याची माहिती वारणा पाटबंधारे उपविभाग, कोडोलीचे उपविभागीय अभियंता यांनी दिली.

महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ तसेच जलसंपदा विभागाच्या शासन निर्णयानुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून ही उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. मनपाडळे लघु पाटबंधारे तलाव, ता. हातकणंगले येथील जलाशयातून शेतीसाठी पाणी उपसा करण्यास पुढील कालावधीत बंदी राहणार आहे.

◼️उपसाबंदीचे कालावधी पुढीलप्रमाणे :

- १६ ते ३० नोव्हेंबर २०२६ – १५ दिवस
- ८ ते २२ डिसेंबर २०२६ – १५ दिवस
- ३० डिसेंबर २०२६ ते १३ जानेवारी २०२७ – १५ दिवस
- २१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२७ – १५ दिवस
- १२ ते २६ फेब्रुवारी २०२७ – १५ दिवस
- ६ मार्च २०२७ पासून पुढील आदेशापर्यंत.

या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित कार्यक्षेत्रातील महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नमूद कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या विद्युत उपसा यंत्रांची वीज जोडणी खंडित करून तारमंडळे काढून घ्यावीत. तसेच कोडोली पाटबंधारे शाखा क्रमांक १ अंतर्गत शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपसा यंत्रे सील करून उपसाबंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी.

उपसाबंदीच्या कालावधीत अनधिकृतपणे पाणी उपसा केल्याचे आढळल्यास संबंधित उपसायंत्रधारकाचा उपसा परवाना एक वर्षासाठी रद्द करण्यात येईल. तसेच यामुळे होणाऱ्या नुकसानीस जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही, असे वारणा पाटबंधारे उपविभागामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes