पन्हाळा महसूल लोक अदालतीत ३० प्रकरणांमध्ये तडजोड; १४२ खातेदारांना लाभ
schedule10 Oct 26 person by visibility 176 categoryराज्य
कोल्हापूर : महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत तहसिल कार्यालय पन्हाळा येथे महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीसाठी एकूण ४५ प्रकरणांमध्ये संबंधितांना उपस्थित राहण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३२ प्रकरणांमध्ये पक्षकार उपस्थित होते.
यातील ३० प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांनी समक्ष परस्पर संमतीने तडजोड सादर केली. या महसूल लोक अदालतीमध्ये एकूण १४२ खातेदारांना लाभ दिल्या असल्याची माहिती तहसिलदार माधवी शिंदे यांनी दिली.
महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्याबाबत निर्देश दिले आहे. त्यानुसार महसूल विषयक प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी या अभियानांतर्गत लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे.