SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पन्हाळा महसूल लोक अदालतीत ३० प्रकरणांमध्ये तडजोड; १४२ खातेदारांना लाभजिल्हास्तरीय पाककृती स्पर्धेतून पोषण विषयक जनजागृती; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विभागाचे कौतुकमुख्य निवडणूक आयुक्तांच्या आंदोलनापूर्वीच हायवोल्टेज ड्रामा: सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके विमानतळावरच ताब्यात, दिल्लीत कडेकोट सुरक्षाजागतिक मानसिक आरोग्य दिन: आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरजडी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचा ‘नगरसेतू’ आंतरराष्ट्रीय 'सेग्यू ३.०' स्पर्धेत ठरला अव्वल गोकुळ निवडणूकीच्या चिन्ह वाटपात महायुतीच्या सत्तेच्या दबावाचे राजकारण आमदार सतेज पाटीलकोल्हापूर: तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण व जबरी चोरी करणारे ३ जण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाईसंभाजीपूर येथील शिबिरात २७७ जणांची तपासणीसाखर कारखान्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर व चारा व्यवस्थापनावर भर द्यावा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडसेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यात बाल आरोग्य तपासणीला वेग

जाहिरात

 

जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धेतून पोषण विषयक जनजागृती; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विभागाचे कौतुक

schedule10 Oct 26 person by visibility 193 categoryराज्य

◼️पोषण माह व सेवा संकल्प अभियान उत्साहात संपन्न

कोल्हापूर : जिल्हा परिषद कोल्हापूरच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागातर्फे पोषण माह व सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा जिल्हा परिषदेच्या सोसायटी हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेतून बालकांच्या पोषणाबाबत जनजागृती करण्यात आली. या अभियानांतर्गत विभागाने केलेल्या उत्कृष्ट कार्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव उपस्थित होते. जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मस्के यांनी प्रास्ताविकात पोषण माह व सेवा संकल्प अभियानाची माहिती दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी बालकाच्या आयुष्यातील पहिले एक हजार दिवस शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे सांगितले. बालकाच्या पोषणाची आणि संगोपनाची जबाबदारी केवळ आईची नसून संपूर्ण कुटुंबाची आहे. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्यामध्ये योग्य पोषण, आरोग्य आणि संगोपनाबाबत जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या स्पर्धेत सहभागी  झालेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिकांचे त्यांनी कौतुक केले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी स्थानिक व सहज उपलब्ध अन्नपदार्थांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या पौष्टिक व रुचकर पाककृतींचे कौतुक केले. बालकांना सकस आहार देण्यासाठी नाविन्यपूर्ण पाककृतींचा वापर करणे, माता व कुटुंबांमध्ये पोषणविषयक जागरूकता वाढविणे आणि अंगणवाडी स्तरावर पौष्टिक आहाराला प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा उद्देश होता.

सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी स्तरावर पात्र लाभार्थ्यांची नवीन नोंदणी, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ मिळवून देणे, विविध शासकीय योजनांची माहिती पोहोचविणे तसेच अंगणवाडी परिसराची स्वच्छता राखणे असे विविध उपक्रम राबविण्यात आले. गरोदर माता, स्तनदा माता आणि बालकांच्या पालकांना शासकीय योजनांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे व लाभ मिळविण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बालकांचे आरोग्य, पोषण, कुपोषण प्रतिबंध आणि स्वच्छतेबाबतही जनजागृती करण्यात आली. या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आणि लाभार्थ्यांपर्यंत शासकीय सेवा पोहोचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाचे आभार शिरोळ बाल विकास प्रकल्प अधिकारी सुजाता शिंदे यांनी मानले. यावेळी सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच जिल्हा कक्षातील अधीक्षक नारायण चांदेकर, विस्तार अधिकारी प्रशांत पाटील, सौरव कांबळे, वरिष्ठ सहायक विद्या पाटील, राजेश मुरगी, कनिष्ठ सहायक अक्षय ढेवले उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes