SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सर्किट बेंचने अवसायनातील दूध संस्था केल्या पात्र; अवसायनातील सर्वच दूध संस्थांच्या मतदानाचा मार्ग मोकळा15 ऑगस्टला इचलकरंजीत मोफत 'बिग चेस इंडिपेंडन्स कॅम्प 2026बहुजनांच्या हाताला रोजगार आणि उद्योजक बनवणारी एमआयडीसी उभारण्यात यशस्वी व्हा..'वारणा' ची म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपया तर गाय दुधास १ रुपया दरवाढ ; आमदार डॉ. विनय कोरे यांची माहितीतरुणांची ऊर्जा आणि देशाचे भविष्य: आंतरराष्ट्रीय युवा दिनलिंगायत समाजाच्या मागण्यांना शासनाचा सकारात्मक प्रतिसाद; प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवातसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाचा ‘प्रारंभ २०२६’ उत्साहात संपन्नस्वातंत्र्यदिनी ‘असाक्षरमुक्त गाव’ शपथ घेण्याचे आवाहनहॅण्डबॉल क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी नागपुरात निवड चाचणीदूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशास १० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

जाहिरात

 

15 ऑगस्टला इचलकरंजीत मोफत 'बिग चेस इंडिपेंडन्स कॅम्प 2026

schedule12 Aug 26 person by visibility 135 categoryराज्य

इचलकरंजी : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केन चेस अकादमी  इचलकरंजी तर्फे व चेसबेस इंडिया च्या सहकार्याने 'द बिग चेस इंडिपेंडन्स कॅम्प २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. ५० वर्ष परंपरा असलेले मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी (MAI) हे या कॅम्पचे व्हेन्यू पार्टनर आहेत.

हा पूर्णपणे मोफत चेस कॅम्प शनिवार , 15 ऑगस्ट 2026 रोजी स्व.  प्रतिभा बाळासाहेब लांडे सांस्कृतिक भवन व डॉ. दिलीप ललासाहेब देशमुख हॉल, यशवंत प्रोसेस मागे, कल्याण केंद्र रोड, इंडस्ट्रीयल इस्टेट, इचलकरंजी येथे आयोजित करण्यात आला आहे.

कॅम्पची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 अशी आहे. या वेळेत खेळाडू केव्हाही येऊ शकतात. हा कॅम्प सर्व वयोगटातील चेस प्रेमींसाठी खुला आहे.

अनुभवी प्रशिक्षकांकडून मूलभूत ते प्रगत पर्यंत चेस प्रशिक्षण, कौशल्ये  व रणनीती सुधारण्यासाठी मार्गदर्शन, तसेच विविध मजेशीर चेस अॅक्टिव्हिटी बुद्धिबळ खेळा आणि एकाचवेळी अनेकजण सोबत बुद्धिबळ खेळा इत्यादी आयोजित करण्यात आले आहेत.

फिडे विकासात्मक प्रशिक्षक व वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहित पोळ - 9657333926 आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू व शाळेत बुद्धिबळ उपक्रम - वरिष्ठ प्रशिक्षक रेश्मा नलवडे 9096221178 यांच्याशी संपर्क साधता येईल.

"शिकणार,खेळणार भारत - तर जिंकणार भारत" या ब्रीदवाक्यासह अधिकाधिक लोकांनी या मोफत कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes