SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
हॅण्डबॉल क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी नागपुरात निवड चाचणीदूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशास १० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढकामगारांची आस, शाहू मिलचा श्वास: मिल पुन्हा सुरू करण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्याकडे साकडंहर घर तिरंगा 2026 अभियान : राष्ट्रध्वज फडकविताना ध्वज संहितेचे पालन कराकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 13.15 मिमी पावसाची नोंद; गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 58 मिमी पावसाची नोंद राधानगरी धरण 99 टक्के भरले; कोल्हापूर जिल्ह्यातील 13 बंधारे पाण्याखालीकोल्हापुरात पोलिसांची मोठी कारवाई: अवैध पिस्टल आणि शस्त्र बनवण्याचे साहित्य जप्त; एक आरोपी गजाआडदादरा आणि नगर हवेली: भारत देशाचा केंद्रशासित प्रदेश बनण्याचा प्रवासकरवीरमध्ये शिवसेनेचे 'बोंब मारो' आंदोलन: आयटी रिटर्नच्या निकषावरून रेशन बंद करणाऱ्या शासनाविरोधात आक्रमक पवित्रा‘सेवा अभियान’तून कोल्हापुरात २५० नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना मिळाला न्याय

जाहिरात

 

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशास १० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

schedule11 Aug 26 person by visibility 101 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  :   शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठीच्या विविध पदवी, पदव्युत्तर व ऑनलाईन अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस दि. १० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती संचालक प्रा.डॉ.पी.एस.पाटणकर यांनी दिली.

 दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रा अंतर्गत बी.ए., बी.कॉम., एम.ए. (मराठी, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र व इतिहास), एम.कॉम. आणि एम.एस्सी. (गणित) या दूरशिक्षण (Distance Mode) अभ्यासक्रमांसह एम.बी.ए., एम.कॉम. आणि एम.एस्सी. (गणित) या ऑनलाईन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत.

    विविध कारणांमुळे नियमित शिक्षण घेता न आलेले विद्यार्थी, शिक्षण अर्धवट राहिलेले विद्यार्थी, नोकरी करणारे कर्मचारी, गृहिणी, उद्योजक, शेतकरी, सैनिक, कामगार तसेच बारावी उत्तीर्ण विद्यार्थी यांच्यासाठी दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे अभ्यासक्रम एक उत्तम संधी उपलब्ध करून देतात. केंद्राच्या ८९ अभ्यासकेंद्रांमार्फत विद्यार्थ्यांना प्रवेशाची सुविधा उपलब्ध आहे.

  शिवाजी विद्यापीठाच्या https://www.unishivaji.ac.in  अधिकृत संकेतस्थळावर प्रवेशासंदर्भातील सविस्तर माहिती उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश पोर्टलवर https://sukapps.unishivaji.ac.in/stud-reg/#/login   जाऊन आपला प्रवेश निश्चित करू शकतात. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या मुख्य कार्यालयाशी किंवा जवळच्या महाविद्यालयातील अभ्यासकेंद्राशी संपर्क साधावा.

   राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने नियमित महाविद्यालय किंवा मुक्त विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही नियमानुसार दुहेरी पदवी (Dual Degree) घेण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन संचालक प्रा.डॉ.पाटणकर यांच्या कडून करण्यात आलेले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes