मुंबईतील ३९ बालगृहांतील ६०० हून अधिक भाऊ-बहिणी रक्षाबंधनानिमित्र एकत्र
schedule29 Aug 26 person by visibility 108 categoryराज्य
◼️ ‘टीम अवर चिल्ड्रन्स’चा अनोखा उपक्रम
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील विविध ३९ बालगृहांमध्ये राहणाऱ्या ६०० हून अधिक भाऊ-बहिणींना ‘टीम अवर चिल्ड्रन्स’ने रक्षाबंधनानिमित्त एकत्र आणले. सायन येथील श्री मानव सेवा संघ येथे रक्षाबंधन उत्साहात झाले.
बालगृहांमध्ये आश्रय घेणाऱ्या बालकांसाठी हा सोहळा केवळ सण साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, भावंडांमधील प्रेम, आपुलकी आणि कौटुंबिक जिव्हाळा अनुभवण्याचा अनोखा क्षण ठरला. विविध बालगृहांमधून आलेली भावंडे एकमेकांना भेटताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला.
या उपक्रमाच्या माध्यमातून बालकांना प्रेम, सुरक्षितता, आपलेपणा आणि एकमेकांच्या सहवासाची जाणीव अनुभवता आली. भावंडांनी एकमेकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत हा दिवस आनंदात साजरा केला.
‘टीम अवर चिल्ड्रन्स’च्या या उपक्रमामुळे बालकांना कौटुंबिक जिव्हाळ्याच्या भावनेचा अनुभव मिळाला. बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि आनंद हाच या सोहळ्याचा खरा उद्देश व यश असल्याचे आयोजकांनी सांगितले.