SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
उंचगाव येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप५ सप्टेंबरला रंगणार युवाशक्ती दहीहंडीचा थरार, पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि लोकप्रिय युवाशक्ती दहीहंडीसाठी प्रथम क्रमांक विजेत्या संघाला ३ लाख रूपयांचे बक्षीसकागल तालुक्यातील सहा 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूरराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात वॉकेथॉनसहकारी बँकिंग तळागाळातील अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा: महाव्यवस्थापक सर्वानन एम.सायबर महाविद्यालयात वारांगना सखी संघटनेसोबत राखी पौर्णिमा उत्साहात राष्ट्रीय क्रीडा दिन : खेळांमुळे घडते सक्षम राष्ट्र भागीरथी महिला संस्थेतर्फे कळंबा आणि बिंदू चौक कारागृहातील बंदीजनांसाठी राबवला रक्षाबंधन उपक्रमवाशी नाका फायरिंग प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश खाडे अखेर गजाआड; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईबिष्णोई ००७ गँगचा म्होरक्या आणि कुख्यात गुंड कोल्हापुरात जेरबंद! स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची थरारक कारवाई

जाहिरात

 

उंचगाव येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

schedule29 Aug 26 person by visibility 137 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : सत्यम फाउंडेशन व शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उंचगाव येथील कुमार व कन्या विद्या मंदिर शाळेमध्ये हुशार, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पाणी बॉटल, वही, कंपास पेटी, पेनसह इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी २२ विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या संस्कारावरच पुढील कार्य चालू राहील.

यावेळी बोलताना सत्यम फाउंडेशनचे प्रतीक शिंदे म्हणाले की, फाउंडेशन च्या वतीने यापुढेही समाजातील गरजू घटकांना मदत करून त्यांना आधार देण्याचे काम करू.

यावेळी सत्यम फाउंडेशनचे प्रतीक शिंदे, शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव, फेरीवाला संघटना उपतालुकाप्रमुख बाळासाहेब नलवडे, वाहतूक सेना तालुकाप्रमुख दत्तात्रय फराकटे, शाळा व्यवस्थापण समितीचे सचिन नागटिळक, प्रकाश मुदुगडे, शिवाजी लोहार, बाळासाहेब कांबळे, संदीप शेटके, अक्षय परीट, धनाजी पाटील तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजय लोंढे, नारायण बेळणेकर  व सर्व सहाय्यक शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes