SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळच्या शासन नियुक्त संचालकांविरोधात महायुतीच्या कार्यकर्त्यांचेच बंड; बानगेत महायुती सरकारच्या पुतळ्याचे दहन!गोकुळ दूध संघाचा ‘डेडलॉक’ दूर करण्यासाठीच सरकारची कारवाई: मंत्री हसन मुश्रीफ‘गोकुळ’ मध्येू वसुबारस निमित्त- म्हैस व गाय-वासराचे पूजन गोकुळसाठी कोल्हापूरकरांचा एल्गार! ९ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा; सतेज पाटलांचा सरकारवर घणाघातगोकुळ व सहकारातील फसवणुकीविरोधातील लढा शिवरायांच्या विचारांच्या बळावर जिंकणार: आमदार सतेज पाटीलमराठी रंगभूमी दिन: परंपरेचा आणि समृद्धतेचा सुवर्णसोहळादुष्काळाचा फटका बसलेल्या सहकारी संस्थांना मोठा दिलासा; निवडणुका लांबल्या तरी बसणार नाही प्रशासकाचा ससेमिरा!झोपडपट्टीतील नागरिकांचे निवासी अतिक्रमण नियमित करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार, खासदार धनंजय महाडिक यांची झोपडपट्टीधारकांना ग्वाहीमोठ्या सहकारी संघांवर थेट शासकीय नजर; ५ नामनिर्देशित सदस्यांच्या समावेशाचा मार्ग मोकळा!बुद्धिबळात उत्कृष्ट कामगिरीबद्दल ऋषिकेश कबनूरकरला 'ब्रँड कोल्हापूर २०२६' पुरस्कार प्रदान!

जाहिरात

 

गोकुळच्या शासन नियुक्त संचालकांविरोधात महायुतीच्या कार्यकर्त्यांचेच बंड; बानगेत महायुती सरकारच्या पुतळ्याचे दहन!

schedule05 Nov 26 person by visibility 62 categoryराजकीय

कोल्हापूर  : गोकुळ दूध संघाच्या राजकारणात आता नवा वाद निर्माण झाला आहे. शासनाने गोकुळवर नियुक्त केलेल्या संचालकांची निवड प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप करत कागल तालुक्यातील बानगे येथे संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले. विशेष म्हणजे, महायुतीतील नेत्यांच्या निर्णयाविरोधात महायुतीच्याच कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या पुतळ्याचे दहन करत निषेध व्यक्त केला. नियुक्ती रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

गोकुळ दूध संघ हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टातून उभा राहिलेला सहकारी संघ आहे. मात्र, या संघावर शासन नियुक्त संचालकांची निवड करताना नियमबाह्य प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप आता खुद्द महायुतीच्या कार्यकर्त्यांकडूनच केला जात आहे. कागल तालुक्यातील बानगे येथे याच निर्णया विरोधात संतप्त दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले.

शासनाने केलेल्या या नियुक्त्या शेतकऱ्यांच्या हिताला डावलणाऱ्या असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. संबंधित कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या निर्णयाविरोधातच आक्रमक भूमिका घेत पुतळा दहन केले.

गोकुळ हा शेतकऱ्यांच्या घामाचा आणि कष्टाचा संघ असून, त्याच्या कारभारात शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना डावलून निर्णय घेणे मान्य नसल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. शासन नियुक्त संचालकांची निवड रद्द करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

◼️बानगे येथील या आंदोलनामुळे गोकुळच्या सत्तासंघर्षाला आता वेगळे वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे, महायुतीतीलच कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतल्याने कागल तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes