SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिकेत गुंठेवारी नियमितीकरणासाठी १६ ऑक्टोबरला विशेष शिबिरसराफ व्यावसायिकांसाठी व्यवसाय परवाना शिबिराला प्रतिसादडी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘माइंडक्राफ्ट हॅकेथॉन’ उत्साहातगोकुळ निवडणूक : ३५ मतदान केंद्रांवर ५ हजार ४१८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क; १९ ऑक्टोबरला मतमोजणीकोरे अभियांत्रिकीत ‘इल्लूमिनेट २०२६’ उद्योजकता कार्यशाळेचे यशस्वी आयोजनसायबर महाविद्यालयात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात गोकुळ धुमशान : “तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?आम्ही शपथ घेणारच नाही" कोल्हापुरात दसरा महोत्सव शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन; बालवाडी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात ठोकला तळ!धम्मचक्र प्रवर्तन दिन: समता, क्रांती आणि करुणेचा सुवर्णदिन

जाहिरात

 

सराफ व्यावसायिकांसाठी व्यवसाय परवाना शिबिराला प्रतिसाद

schedule14 Oct 26 person by visibility 153 categoryउद्योग

◼️नवीन परवान्यासाठी १५ अर्ज दाखल ; २० परवान्यांचे नूतनीकरण

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या परवाना विभागामार्फत महाद्वार रोड येथील कोल्हापूर सराफ असोसिएशनच्या सभागृहात सराफ व्यावसायिकांसाठी नवीन व्यवसाय परवाना व परवाना नूतनीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला व्यावसायिकांचा प्रतिसाद मिळाला. नवीन व्यवसाय परवान्यासाठी १५ अर्ज दाखल झाले असून, २० व्यावसायिकांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले. तसेच अन्य २० व्यावसायिकांना आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कोल्हापूर सराफ असोसिएशनच्या मागणीनुसार आज सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेले हे शिबिर उपआयुक्त किरण कुमार धनवाडे व सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, किरण नकाते तसेच सराफ असोसिएशनचे संचालक उपस्थित होते. व्यावसायिकांना व्यवसाय परवाना मिळविण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, तसेच परवान्यांचे नूतनीकरण वेळेत करता यावे, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात परवाना अधीक्षक अशोक यादव, परवाना निरीक्षक संदीप भोई, भोलानाथ पाटणकर यांच्यासह परवाना विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes