SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिकेत गुंठेवारी नियमितीकरणासाठी १६ ऑक्टोबरला विशेष शिबिरसराफ व्यावसायिकांसाठी व्यवसाय परवाना शिबिराला प्रतिसादडी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘माइंडक्राफ्ट हॅकेथॉन’ उत्साहातगोकुळ निवडणूक : ३५ मतदान केंद्रांवर ५ हजार ४१८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क; १९ ऑक्टोबरला मतमोजणीकोरे अभियांत्रिकीत ‘इल्लूमिनेट २०२६’ उद्योजकता कार्यशाळेचे यशस्वी आयोजनसायबर महाविद्यालयात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात गोकुळ धुमशान : “तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?आम्ही शपथ घेणारच नाही" कोल्हापुरात दसरा महोत्सव शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन; बालवाडी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात ठोकला तळ!धम्मचक्र प्रवर्तन दिन: समता, क्रांती आणि करुणेचा सुवर्णदिन

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिकेत गुंठेवारी नियमितीकरणासाठी १६ ऑक्टोबरला विशेष शिबिर

schedule14 Oct 26 person by visibility 185 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : महानगरपालिका क्षेत्रातील गुंठेवारी नियमितीकरणाची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी महानगरपालिकेच्या नगररचना विभागामार्फत शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी एक दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार हे शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील नगररचना विभागाकडे गुंठेवारी नियमितीकरणासाठी दाखल झालेल्या प्रकरणांवर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने हे शिबिर घेण्यात येत आहे. हे शिबिर  राजारामपुरी, बागल मार्केट, दुसरा मजला  नगररचना विभागात होणार आहे.

या शिबिरात संबंधित अर्जदार, मिळकतधारक, आर्किटेक्ट व इंजिनिअर यांनी गुंठेवारी नियमितीकरणाच्या कामासाठी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. या शिबिरामुळे नियमितीकरणासाठी दाखल झालेल्या प्रकरणांबाबत आवश्यक कार्यवाही करण्यास मदत होणार आहे.

तरी या एकदिवसीय शिबीराचा जास्तीत जास्त मिळकतधारक, आर्किटेक्ट व इंजिनिअर  यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या नगररचना विभागामार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes