केंद्र सरकार करणार जातीय जनगणना, मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
schedule30 Apr 25 person by visibility 200 categoryदेश

नवी दिल्ली : मोदी मंत्रिमंडळाने जातीय जनगणनेबाबत निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे की, जनगणनेत (भारतात जातींची गणना) जातींची गणना केली जाईल.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विरोधकांवर आरोप केला की काँग्रेस नेहमीच जातींचा वापर मतपेठीसाठी करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांनी या मागणीवरून केंद्र सरकारला अनेकदा घेरले होते. तर इतर राज्यांतील प्रादेशिक पक्षांनीही जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली होती. आता याचाच परिणाम म्हणून केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.