छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहिमेला 24 पासून प्रारंभ
schedule21 Nov 25 person by visibility 57 categoryसामाजिक
कोल्हापूर : येथील एनसीसी गट मुख्यालय (कोल्हापूर) यांच्यामार्फत प्रतिवर्षाप्रमाणे 24 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत विशालगड ते पन्हाळा या ऐतिहासिक मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहीम राबविण्यात येणार तथापी 4 डिसेंबरपर्यंत हा कॅम्प असल्याची माहिती ब्रिगेडियर आर.के.पैठणकर यांनी दिली .
या मोहिमेत बारा राज्यातील एनसीसीचे विद्यार्थी सहभागी होणार असून त्यांच्या चार तुकड्या असणार आहेत. त्यातील एक तुकडी मुलींची तर तीन तुकड्या मुलांच्या राहणार आहेत. प्रत्येक तुकडीत 260 विद्यार्थी सहभागी असणार आहे.या मोहिमेचा कालावधी सात दिवसांचा राहणार असून सहभागी विद्यार्थ्यांना इतिहासापासून प्रेरणा मिळावी.तो कालखंड अनुभवता यावा.राष्ट्रप्रेम जागृत व्हावे, तत्कालीन कालखंडात सैन्यदलाला कोणत्या अडचणी आल्या याची माहिती NCC च्या विद्यार्थ्यांना व्हावी.या उद्देशाने ही मोहीम आखण्यात आली आहे.
या मोहिमला अतिरिक्त महासंचालक,महाराष्ट्र संचालनालय,राष्ट्रीय कॅडेट कोअर (NCC) अर्थात ADG - मेजर जनरल विवेक त्यागी तर मुलींच्या तुकडीला खा.शाहू महाराज छ.हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत.चार दिवस चालणाऱ्या या मोहिमेमुळे राज्यातील विविध सहभागी एनसीसी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संस्कृती तसेच ऐतिहासिक कालखंडाची ओळख निर्माण होण्यास निश्चित मदत होईल असा विश्वास ही श्री.पैठणकर यांनी व्यक्त केला.यावेळी कर्नल(डेप्युटी)अनुप रामचंद्रन, लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई आदी उपस्थित होते.