शिवाजी विद्यापीठाच्या गुणपत्रिकेची प्रत पदवीधरांना तात्काळ देण्याचे विद्यापीठ प्रशासनाचे 'पदवीधर मित्र'ला आश्वासन
schedule21 Nov 25 person by visibility 79 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : पदवीधरांच्या मागणीनुसार एकाच दिवसात गुणपत्रिकेची प्रत देण्याचे आश्वासन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव विलास शिंदे यांनी पदवीधर मित्रचे अध्यक्ष माणिक पाटील-चुयेकर यांच्या नेतृत्वाखालील याबाबत भेटलेल्या शिष्टमंडळास नुकतेच दिले.
सध्या विधानपरिषदेच्या पुणे मतदार संघात पुढील वर्षी नोव्हें.-डिसेंबर मध्ये होणाऱ्या निवडणुकीची मतदार नोंदणी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. ही मतदार नोंदणी करताना मतदार नोंदणी अर्जासोबत गुणपत्रिका अथवा पदवी - प्रमाणपत्राची प्रत जोडणे अनिवार्य आहे.
परंतु पुणे पदवीधर मतदार संघात येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्हयातील अनेक ज्येष्ठ तसेच वयोवृद्ध पदवीधराकडे गुणपत्रिका अथवा पदवी प्रमाणपत्र उपलब्ध नाहीत. त्यांना विद्यापीठाकडून गुणपत्रिकेची प्रत तात्काळ मिळाल्यास त्यांचा पदवीधर मतदार नोंदणीचा तसेच या निवडणुकीतील मतदानाचा मार्ग सुकर होणार आहे.