SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शासकीय रुग्णालयामधील तपासणी व उपचार पूर्वीप्रमाणे निःशुल्कमहिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेपरीक्षा काळात सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या केंद्रांवर अन्य शाळांमधील केंद्र संचालकनॅशनल हॅंडीक्राफ्ट डेव्हलमेन्ट कार्यक्रमांचे 10 रोजी आयोजनराज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला 'नॅशनल इनोव्हेंचर महाराष्ट्रातील नंबर वन' पुरस्कारघरयादी व घरगणना १४ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा : आयुक्त के. मंजूलक्ष्मीकोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अव्वल; विजयी उमेदवारांची यादी...जिल्ह्यात 'कॉपीमुक्त अभियान' प्रभावीपणे राबविण्यात येणार : जिल्हाधिकारी अमोल येडगेइचलकरंजीच्या महापौरपदी भाजपचे उदय धातुंडे, उपमहापौरपदी अँड. अनिल डाळ्या बिनविरोध

जाहिरात

 

घरयादी व घरगणना १४ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा : आयुक्त के. मंजूलक्ष्मी

schedule09 Feb 26 person by visibility 106 categoryमहानगरपालिका

▪️महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या वसुलीचा घेतला आढावा

कोल्हापूर  : केंद्र शासनाच्या आदेशानुसार शहरात सुरू असलेले जनगणनेचे कामकाज निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावे, असे निर्देश प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी दिले. पहिल्या टप्प्यातील घरयादी व घरगणनेचे कामकाज १४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. जनगणनेच्या कामकाजाबाबत आज दुपारी आयुक्त कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रभागनिहाय १८० ते २०० घरे किंवा ६५० ते ८०० लोकसंख्या यापैकी जे अधिक असेल, त्यानुसार एक गट तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून प्रत्यक्ष क्षेत्रीय कामकाज सुरू करण्यात आले आहे.

   केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जनगणना दोन टप्प्यांत राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना, तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष नागरिकांची गणना करण्यात येणार आहे. सदरची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार असून त्यासाठी योग्य नियोजन व आवश्यक अधिकारी-कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

  या जनगणनेचे मुख्य जनगणना अधिकारी म्हणून आयुक्त कार्यरत असून उप-आयुक्त शहर जनगणना अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. चारही विभागीय कार्यालयांचे प्रभाग क्षेत्रीय अधिकारी व उप-शहर अभियंते चार्ज अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

यानंतर प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी महानगरपालिकेच्या नगररचना, घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट व परवाना विभागांच्या वसुलीचा सविस्तर आढावा घेतला. नगररचना विभागाने विशेष वसुली कॅम्प आयोजित करावेत, घरफाळा विभागाने मोठ्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच पाणीपुरवठा विभागाने मोठ्या थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे निर्देश दिले. इस्टेट व परवाना विभागांनाही ठरविलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

  या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त कृष्णात पाटील, स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे, जयंत जावडेकर, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उप-शहर रचनाकार एन. एस. पाटील, उप-शहर अभियंता सुरेश पाटील, निवास पोवार, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चलावाड, रचना व कार्यपद्धती अधीक्षक प्रशांत पंडत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, सिस्टीम मॅनेजर यशपाल रजपूत उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes