SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भूजल विभागाकडून जोगमवाडी येथे वनराई बंधारा निर्मिती ‘शिवशस्त्रशौर्यगाथा – वाघनख’ प्रदर्शनाचा उद्या अखेरचा दिवसबस्तवाड येथील आरोग्य शिबिरात ४१८ नागरिकांची तपासणीउच्च शिक्षण संस्थांमध्ये सशक्त संशोधन संस्कृती रुजवणे काळाची गरज : डॉ. महादेव लोखंडेसायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी ‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेल : एनसीएसआरसीचे संचालक डॉ. खलीराज ई. यांचा विश्वास विद्यार्थिनींच्या हितासाठी परिवहन समितीचा सकारात्मक निर्णय; ४७ केएमटी पास वापरण्यास मंजुरीराज्यातील नागरिकांना मोफत व माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरकोल्हापूर : मोफत केएमटी पास वितरण: केएमसी कॉलेजच्या प्र. प्राचार्यांकडून परिवहन विभागाची दिलगीर व्यक्त!राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडू

जाहिरात

 

भूजल विभागाकडून जोगमवाडी येथे वनराई बंधारा निर्मिती

schedule31 Oct 26 person by visibility 78 categoryराज्य

कोल्हापूर : वरिष्ठ भूवैज्ञानिक,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (GSDA) जिल्हा कार्यालय - कोल्हापूर यांच्यावतीने राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली ग्रामपंचायत अंतर्गत जोगमवाडीतील ओढ्यावर वनराई बंधारा आज बांधण्यात आला.      

 हा बंधारा जोगमवाडी गावाच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीशेजारीच बांधण्यात आला असल्याने ओढ्यातून वाहून जाणारे पाणी अडवून भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे.या बंधाऱ्यामुळे अडवलेले पाणी जमिनीत मुरून शेजारील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीची जलपातळी उन्हाळ्यातही टिकून राहण्यास हातभार लागणार आहे . 
            
 ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि उपलब्ध नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाचा योग्य वापर करून भूजल पुनर्भरण (Groundwater Recharge) करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.                                या वनराई बंधाऱ्याच्या कामासाठी स्थानिक नागरिक, ग्रामसेवकासह इतर पदाधिकारी व संबंधित तांत्रिक कर्मचाऱ्यांचे सहकार्य मोठ्या प्रमाणावर लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes