SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत शिक्षण महर्षी आणि अजातशत्रू, थोर व्यक्तीमत्व हरपल्याची भावना केली व्यक्तगोकुळ निवडणुकीवरून प्रशासनाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल!कळंब्यातील स्फोटाचे रहस्य उलगडले! दिवाणी वादातून घडवला होता जिलेटीनचा स्फोट; तीन आरोपींना अटकनिवडणूक जिंकल्यावर डी. वाय. दादा, बंटी आणि माझे अभिनंदन करायचे...; हसन मुश्रीफ यांनी जागवल्या आठवणीकोरगावकर ट्रस्टचा पर्यावरण संवर्धनासाठी स्तुत्य उपक्रम; ११ वर्षांपासून १० हजार रोपांचे मोफत वाटपआंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिन: सुरक्षित प्रवासाचा पायास्पर्धात्मक युगातील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना विशेष प्रशिक्षणशिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद! ​खासदार धनंजय महाडिक यांची भावपूर्ण श्रद्धांजलीकोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदन

जाहिरात

 

गोकुळ निवडणुकीवरून प्रशासनाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल!

schedule05 Aug 26 person by visibility 121 categoryउद्योग

कोल्हापूर  : सर्वोच्च न्यायालयाच्या ६ मे २०२६ रोजीच्या आदेशाचे पालन न करणे आणि गोकुळ दूध संघाची निवडणूक जाणीवपूर्वक लांबवणे संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी शासकीय निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त व सहकार-दुग्ध विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांविरुद्ध अखेर सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.

 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसांच्या आत घेणे बंधनकारक होते. मात्र, विहित मुदत संपत आली तरी निवडणूक कार्यक्रमाची साधी सुरुवातही करण्यात आलेली नाही. त्यापूर्वी,  उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर येथे दाखल केलेल्या याचिकेत गोकुळची निवडणूक तत्काळ घेण्याचे किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. 

या उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर प्राधिकरणाचे सचिव  गाडे यांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध न केल्याबद्दल  मिसाळ यांच्याकडे खुलासा मागितला होता आणि पुढे  मिसाळ यांनी कोल्हापूर येथील साहाय्यक निबंधक-दुग्ध  कृष्णात ठाकरे यांना नोटीस बजावली होती. परंतु, आजअखेर  ठाकरे यांनी कोणतीही माहिती किंवा खुलासा सादर केला नाही.


या गंभीर प्रकरणात शासकीय निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त  अनिल महादेव कवडे, प्राधिकरणाचे सचिव  अशोक गाडे, तत्कालीन उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध पुणे विभाग पुणे  राजकुमार पाटील, सध्याचे उपनिबंधक  देविदास मिसाळ आणि सहनिबंधक दुग्ध कोल्हापूर  कृष्णात ठाकरे या सर्वांविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.

 करवीर तालुक्यातील हासूर येथील 'कै. राऊ सखाराम पाटील सहकारी दूध व्यावसायिक संस्था' यांनी निवडणूक कार्यक्रम विहित कालावधीत पूर्ण न करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करून कारवाई करावी, यासाठी हा कायदेशीर लढा पुकारला आहे. या महत्त्वपूर्ण अवमान याचिकेची आणि शासनाने मुदतवाढीसाठी दाखल केलेल्या अर्जाची सुनावणी सोमवार, दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी निश्चित करण्यात आली असून, न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर या सुनावणीदरम्यान काय कारवाई होते, याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes