डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या तीन विद्यार्थ्यांची कोरियातील प्रतिष्ठित विद्यापीठांत संशोधनासाठी निवड
schedule02 Dec 25 person by visibility 54 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चच्या डॉ. श्रद्धा भोसले, डॉ. विकास मगदुम आणि डॉ. सतिश फाळके या तीन विद्यार्थ्यांची कोरियातील प्रतिष्ठित यॉन्सेई हानयांग आणि चुंग-आंग या तीन प्रतिष्ठीत विद्यापीठांमध्ये पोस्ट डॉक्टरेट संशोधक म्हणून निवड झाली आहे .
डॉ. श्रद्धा भोसले या यॉन्सेई विद्यापीठातील पदार्थ विज्ञान या विभागात ‘ऊर्जा साठवणूक आणि हरित हायड्रोजन निर्मितीसाठी एरोजेल पदार्थ’ या विषयावर प्रा. पार्क यांच्या मार्गदर्शना खाली संशोधन करणार आहेत. डॉ. विकस मगदुम हे हानयांग विद्यापीठतील साहित्य विज्ञान व रासायनिक अभियांत्रिकी विभागात ‘उत्प्रेरक व संवेदक अनुप्रयोगांसाठी संकरित पदार्थांचा विकास’ या विषयावर प्रा. ह्ये सुंग ली यांच्या मार्गदर्शना खाली संशोधन करणार आहेत. तर डॉ. सतिश फाळके हे प्रोफेसर जोंग पिल पार्क यांच्या प्रयोगशाळेत ‘बायोसेंसर आणि बायोमेडिकल अनुप्रयोग’ या संशोधन क्षेत्रात कार्य करणार आहेत.
डॉ. भोसले,डॉ. मगदुम आणि डॉ. फाळके यांनी आपला पीएच.डी. अभ्यासक्रम डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर येथे सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चच्या प्रा. डॉ. उमाकांत पाटील, प्रा. डॉ. जयवंत एल. गुंजकर आणि प्रा. डॉ. विश्वजीत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. यापूर्वी या तिघांचे संशोधन अनेक प्रतिष्ठित संशोधन पत्रिकांत प्रकाशित झाले आहे त्यांच्या संशोधनातील उत्कृष्ट योगदान, नावीन्यपूर्ण काम तसेच विभागप्रमुख प्रा. डॉ. सी डी लोखंडे व सर्व यांचे मार्गदर्शन व पाठबळ यामुळे त्यांना ही आंतरराष्ट्रीय संशोधन संधी मिळाली आहे.
या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, विभागप्रमुख प्रा. सी. डी. लोखंडे आणि संशोधन संचालक प्रा. पी. एस. पाटील यांनी अभिनंदन करून पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या.