SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बळकट पावलं, सुरक्षित हात! कोल्हापुरी चर्मकलेच्या विकासासाठी महाडिकांचे ऐतिहासिक विधेयकशेतकरी आणि घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा दिलासा; बिनशेती प्रक्रिया सुलभीकरणाचा निर्णय ऐतिहासिक : प्रकाश आबिटकरई प्रवर्गातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी पंचवार्षिक निवडणुक प्रक्रिया पुर्ण करावीभावी शिक्षकांनो, 'जनरेशन झेड'साठी आता केवळ बुद्ध्यांक नव्हे, मानसिक स्थैर्यही महत्त्वाचे! : प्रा. अजय साळी ​कोरे अभियांत्रिकीच्या एनसीसी विभागाकडून रांगणा किल्ला पदभ्रमंतीडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना ’एसएई इंडिया बाहा’ मध्ये १० पुरस्कारनिरोगी भविष्याचा 'सुरक्षा कवच': राष्ट्रीय लसीकरण दिवस!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागतमहिला भाविकांसाठी कोल्हापुरात उपलब्ध होणार स्वच्छतागृहकोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित

जाहिरात

 

भावी शिक्षकांनो, 'जनरेशन झेड'साठी आता केवळ बुद्ध्यांक नव्हे, मानसिक स्थैर्यही महत्त्वाचे! : प्रा. अजय साळी

schedule16 Mar 26 person by visibility 116 categoryशैक्षणिक

◼️ शिवाजी विद्यापीठात 'नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र' कार्यशाळा उत्साहात
कोल्हापूर : "आजच्या 'जनरेशन झेड' (Gen Z) मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भावी शिक्षकांनी केवळ बुद्ध्यांक (IQ) किंवा भावनिक बुद्धिमत्तेवर (EQ) अवलंबून राहून चालणार नाही. बदलत्या काळात या विद्यार्थ्यांमध्ये मानसिक स्थैर्य निर्माण करणे हे शिक्षकांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे," असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. अजय साळी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात आयोजित 'नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र' (Innovative Pedagogy) या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.

यावेळी अधिविभागप्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी शिक्षकाच्या बदलत्या आणि संवेदनशील भूमिकेवर प्रकाश टाकला. विद्यापीठीय शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित नसून ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कसे पूरक ठरावे, याचे मार्गदर्शन त्यांनी केले.

 कार्यशाळेचे समन्वयक डॉ. विद्यानंद खंडागळे यांनी पाचव्या औद्योगिक क्रांतीचा संदर्भ देत, आधुनिक काळातील अध्ययनासाठी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींची नितांत गरज असल्याचे स्पष्ट केले.
कार्यशाळेत साधन व्यक्ती श्री. सतीश कुंभार यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून अध्यापनाच्या विविध प्रतिकृती (Models) तयार करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले.

या कार्यशाळेसाठी कोल्हापूर शहर, सांगली, गारगोटी आणि गडहिंग्लज येथील अध्यापक महाविद्यालयांतील शिक्षक प्रतिनिधी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले. याप्रसंगी डॉ. रूपाली संकपाळ, सरस्वती कांबळे, सारिका पाटील यांच्यासह सर्व संशोधक विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes