कोरे अभियांत्रिकीच्या एनसीसी विभागाकडून रांगणा किल्ला पदभ्रमंती
schedule16 Mar 26 person by visibility 100 categoryशैक्षणिक
वारणानगर : वारणा विद्यापीठ, वारणानगर अंतर्गत असलेल्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातर्फे रांगणा किल्ल्यावर पदभ्रमंतीचे आयोजन करण्यात आले.
या पदभ्रमंतीत एनसीसी छात्र सैनिकांनी सुमारे २७ किलोमीटर अंतर पार करत शिस्त, एकता व शारीरिक क्षमतेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. अशा किल्ले पदभ्रमंतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये साहसाची भावना वाढते, शारीरिक तंदुरुस्ती सुधारते तसेच इतिहासाची ओळख होण्यास मदत होते.
ही पदभ्रमंती असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. रणजीत नाईक यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. गाईड संदीप देसाई यांनी किल्ल्याचा इतिहास व गडावरील ऐतिहासिक स्थळांची माहिती दिली.
या उपक्रमासाठी वारणा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व आमदार डॉ. विनय कोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के तसेच श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांचे प्रोत्साहन लाभले. प्राचार्य डॉ. डी. एन. माने व अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे यांचे सहकार्य लाभले.
या पदभ्रमंतीसाठी एनसीसी सीनियर अंडर ऑफिसर इंद्रजीत कोळपे, ज्युनिअर अंडर ऑफिसर अवधूत साळुंखे, वीरसेन चिकने, सार्जंट रूपम मोकाशी, कार्पोरल विश्वजीत कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले. छात्र सैनिकांच्या सोबत डॉ. अमोल पाटील, प्रा. बाळकृष्ण पोतदार, प्रा संभाजी शेळके, श्री. सुरज खोत, विजय चौगुले यांनी सहभाग नोंदवला.