SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ऑनलाईन एम.बी.ए.अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात तबला कार्यशाळा उत्साहात सृष्टी संजीवन राष्ट्रीय पर्यावरण परिषदेची यशस्वी सांगतासमानतेबरोबरच स्त्री -पुरुष सहचार्य महत्वाचे : राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहलता नरवणे-श्रीकर यांचे प्रतिपादनतात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींची अश्वमेध क्रीडा स्पर्धा -२०२५ बास्केटबाँल स्पर्धत उकृष्ट कामगिरीहिरकणी मंच तर्फे विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींचा सन्मानस्त्रियांच्या सन्मानार्थ...कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 20 मार्चपर्यंत बंदी आदेश लागूकोल्हापूर : घरफाळा थकबाकीपोटी आर.टी.ओ. ऑफीस परीसरातील दोन मिळकती सीलदावोसच्या गुंतवणुकीतून किती नोकऱ्या निर्माण होतील; आमदार सतेज पाटील यांचा सवाल

जाहिरात

 

डी.वाय.पाटील मेडिकल संघाला विजेतेपद; डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा

schedule29 Dec 23 person by visibility 524 categoryक्रीडा

कोल्हापूर : डी. वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज संघाने विजेतेपद पटकावले. 

डी.वाय.पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कदमवाडी येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. अभिजीत कोराणे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. ए.ए.राठोड यांनी नाणेफेक करून सामन्याची सुरुवात केली. यावेळी क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, सुशांत कायपुरे, तसेच सर्व कॉलेजचे स्पोर्ट्स इन्चार्ज उपस्थित होते.

 अंतिम सामना मेडिकल कॉलेज व कॉलेज ऑफ फार्मसी या दोन् संघात झाला. मेडिकल कॉलेजने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. यासीर शेख व सुकरीत यादव यांच्या अनुक्रमे 85 धावा (55 चेंडू) व 74 धावा (49 चेंडू) जोरावर मेडिकल कॉलेजने 20 षटकात 189 धावा केल्या. फार्मसी कॉलेजचे खेळाडू रितेश इंगोले व पारस पाटील यांनी अनुक्रमे 13 धावा व 27 धावा केल्या मात्र त्यांचा संघ सर्व बाद 94 धावाच करू शकला. मेडिकल कॉलेज आदित्य देवल याने उत्कृष्ट गोलंदाजी करत 4 षटकट 13 धावा देऊन 2 गडी बाद केले. या स्पर्धेत कॉलेज ऑफ नर्सिंगच्य संघाने तृतीय स्थान मिळवले.

कुलपती डॉ.संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील, कुलगुरू डॉ.राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes