SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कुलगुरू डॉ डी टी शिर्के याच्या हस्ते राष्ट्रीय क्रॉस कंट्री पदक प्राप्त खेळाडूंचा सत्कारविधानसभेची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी; यंत्रणा सज्ज; कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील मतमोजणी खालील ठिकाणी होणार....विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात 76.63 टक्के मतदान : जिल्हाधिकारी अमोल येडगे ; कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी पहा...कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान; राज्यामध्ये उच्चांकी मतदानाची परंपरा कायम; मतदार जनजागृती (SVEEP) उपक्रमांमुळे वाढला टक्काविधानसभा निवडणूक २०२४ : मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळ संपन्नकिमान आधारभूत किंमत खरेदी योजना 2024-25 अंतर्गत धान (भात) व रागी (नाचणी) शेतकरी नोंदणीस 15 डिसेंबरपर्यंत मुदतशिवाजी विद्यापीठ आणि मिड स्विडन विद्यापीठातील संशोधन प्रकल्प समाजासाठी उपयुक्तमुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवायला येणार ‘गुलकंद’ ;१ मे २०२५ रोजी होणार प्रदर्शितकोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान; करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदानधन्यवाद कोल्हापूर, राज्यात पुन्हा मतदान टक्केवारीत जिल्हा अग्रेसर : जिल्हाधिकारी, अमोल येडगे

जाहिरात

 

किमान आधारभूत किंमत खरेदी योजना 2024-25 अंतर्गत धान (भात) व रागी (नाचणी) शेतकरी नोंदणीस 15 डिसेंबरपर्यंत मुदत

schedule21 Nov 24 person by visibility 105 categoryराज्य

कोल्हापूर : आधारभूत किंमत खरेदी योजना 2024-25 अंतर्गत ज्या शेतक-यांना चालु (2024-25) हंगाम मधील त्यांनी पिकविलेले धान (भात) व नाचणी (रागी) हमीभावाने विक्री करायची आहे त्या शेतक-यांनी 15 डिसेंबर 2024 पर्यंत नमुद खरेदी केंद्रावर समक्ष जाऊन नोंदणी करावी, असे अवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी गजानन मगरे यांनी केले आहे.

मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत खालील ठिकाणी शेतकरी नोंदणी सुरु केली आहे.

आजरा तालुका किसान सहकारी भात खरेदी विक्री संघ मर्यादित तालुका आजरा, चंदगड तालुका कृषीमाल फलोत्पादन सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित दाटे (अडकूर), कडगाव, भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघ मर्यादित गारगोटी ता. भुदरगड (दासेवाडी),  राधानगरी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित सरवडे तालूका राधानगरी या कार्यालयात धान (भात) व रागी (नाचणी) साठी नोंदणी सुरु आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी उद्योग खरेदी विक्री संस्था मर्यादित कोल्हापूर केंद्र -बामणी, भुदरगड तालुका सहकारी कृषी औद्योगिक भाजीपाला व फळे खरेदी विक्री संघ मर्यादित गारगोटी तालुका भुदरगड केंद्र कडगाव, राधानगरी तालुका ज्योतिर्लिंग सहकारी भाजीपाला खरेदी विक्री संघ मर्यादित पनोरी (राशिवडे) केंद्र-चंद्रे, चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित तुर्केवाडी व या कार्यालयात धान (भात) व शेतकरी विकास शेतीमाल उत्पादन व प्रक्रिया सहकारी संस्था मर्या. रांगोळी, ता. हातकणंगले केंद्र गडहिंग्लज या कार्यालयात रागी (नाचणी) साठी नोंदणी सुरु आहे.

शासनाने FAQ प्रतीच्या धान (भात) साठी 2 हजार 300 रुपये व रागी (नाचणी) करिता 4 हजार 290 रुपये प्रति क्विंटल हा हमीभाव जाहीर केला आहे. नोंदणी करिता शेतक-यांचा चालू (2024-25) हंगाम मधील धान (भात) व नाचणी पिकपे-याची नोंद असलेला 7/12 उतारा, आधार कार्डची झेराक्स, बँक पासबुक आवश्यक आहे. तसेच शेतक-यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक असल्यास शेतक-यांना फोटो करीता केंद्रावर स्वतः उपस्थित रहावे लागणार आहे. संबंधित ठिकाणी जाऊन नोंदणी करणे गरजेचे असुन नोंदणीकृत शेतक-यांची खरेदी करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापुर, गडहिंग्लज अथवा जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय शाहू मार्केट यार्ड, कोल्हापुर येथे संपर्क करावा, असेही  मगरे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes