नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन
schedule03 Nov 24 person by visibility 580 categoryराज्य
मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी समीर खान यांचा अपघात झाला होता.
समीर खान यांचा कुर्ला येथे भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. समीर खान यांचे रविवारी निधन झाल्याची माहिती स्वतः माजी मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत दिली.
या अपघातानंतर कारचालकाला ताब्यात घेऊन विनोबा भावे पोलिसांनी पुढील तपास सुरु केला होता. दरम्यान नवाब मलिक यांनी पुढील काही दिवसांचे कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.