SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

कळंबा उपसरपंचपदी दिपाली रोपळकर बिनविरोध

schedule23 Aug 25 person by visibility 635 categoryराजकीय

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कळंबा तर्फे ठाणे उपसरपंचपदी दिपाली योगेश रोपळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पुनम जाधव यांनी  राजीनामा दिल्याने रिक्त झाल्या पदावर दिपाली  रोपळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून जल्लोष व्यक्त केला. ग्रामपंचायतीवर आमदार सतेज पाटील गटाची सत्ता आहे.

यावेळी लोकनियुक्त सरपंच सुमन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय अधिकारी विलास राबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी 22 ऑगस्ट रोजी  उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली. दिपाली  रोपळकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव, माजी उपसरपंच पूनम जाधव, संदीप पाटील, दीपक तिवले, छाया भवड, भाग्यश्री पाटोळे, रोहित मिरजे, विकास पवार- बावडेकर, रोहित जगताप, संदीप पाटील, स्नेहल जाधव, मीना गौंड, नितीश शिंदे, स्वरूप पाटील,  वैशाली टिपुगडे, आशा टिपुगडे, संगीता माने, तसेच माजी सरपंच विश्वास गुरव, योगेश रोपळकर ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश खडके लक्ष्मण मिरजे महादेव तिवले अमोल पाटील विशाल सोनवणे निवृत्ती चौगुले ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes