SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात धक्कादायक घटना: माजी महापौरांच्या १७ वर्षीय नातवाची आत्महत्यास्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये २७ जूनला अभियांत्रिकी प्रवेशाबाबत मार्गदर्शनक्रांतीची पहिली ठिणगी: हुतात्मा दामोदर हरी चाफेकरसंजय घोडावत इन्स्टिट्यूट, उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये सर्व विभागांचा उच्चांकित निकाल; २९ विषयाचा निकाल १०० टक्केविश्वप्रभा नागरी पतसंस्थेतील ८ कोटींच्या अपहाराची चौकशी करा; ठेवीदारांचा आक्रमक पवित्राकोल्हापूर : उपसा बंदीला २६ जूनपर्यंत पुन्हा शिथिलताक्रांती चौकाने घेतला मोकळा श्वास ; शहरातील युवकांच्याकडून नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचे अभिनंदन डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे उद्यापासून दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प’दहावी नंतरच्या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्जाची मुदत वाढली; आता २ जुलैपर्यंत अर्ज करता येणारअवसायकांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाचा दणका; फणसवाडीच्या हनुमान सहकारी दूध संस्थेच्या याचिकेवर निर्णय

जाहिरात

 

स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये २७ जूनला अभियांत्रिकी प्रवेशाबाबत मार्गदर्शन

schedule24 Jun 26 person by visibility 102 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण होऊन अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या वतीने ऑनलाईन मध्यवर्ती प्रवेश प्रक्रियेबाबत २७ जून रोजी मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या चर्चासत्रामध्ये विद्यार्थी व पालकांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात येणार असून नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, ई-स्क्रुटिनी, मेरिट लिस्ट, ऑप्शन फॉर्म भरण्याची पद्धत, प्रवेशाच्या विविध फेऱ्या, महाविद्यालय व शाखा निवडीचे निकष, शुल्क संरचना तसेच प्रवेश प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

 सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात योग्य माहितीच्या अभावामुळे अनेक विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत अडचणींना सामोरे जातात. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेले हे चर्चासत्र विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना त्यांच्या गुणांनुसार आणि आवडीनुसार योग्य महाविद्यालय व शाखा निवडण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेत होणाऱ्या सामान्य चुका टाळण्याच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे आहे. 
चर्चासत्रात स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण व प्लेसमेंट सेल समन्वयक डॉ. गणेश पाटील मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती स्कूलचे संचालक डॉ. अजित कोळेकर यांनी दिली.


विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी) येथे शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता हे मार्गदर्शन चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी व पालकांनी या चर्चासत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes