SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय बास्केटबॉलसह पाच राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाचा जिल्ह्याला मानप्लास्टिक वापर व अस्वच्छतेविरोधात महापालिकेची धडक कारवाईअनधिकृत पाणी जोडण्या, दुकाने व लॉजिंगवर कठोर कारवाई करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडमाळकर तिकटी, गंजी गल्ली ते बिंदू चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी धडक कारवाईशिवाजी विद्यापीठाला राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत तिसऱ्यांदा विजेतेपदउच्च राजकीय-सामाजिक नैतिकतेचे दुसरे नाव म्हणजे डॉ. एन. डी. पाटील: किशोर बेडकीहाळशासनाकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन सेवांवरच अवलंबून : राज्य आयुक्त सुधाकर तेलंगफुटबॉलच्या रणांगणात आज 'महामुकाबला': मेस्सीच्या जादूची की केनच्या करिष्म्याची गाजणार दहशत?फीफा वर्ल्ड कप २०२६: स्पेनचा दणदणीत विजय; फ्रान्सला धूळ चारत गाठली अंतिम फेरी!जागतिक युवा कौशल्य दिन: भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी तरुणांचे सक्षमीकरण

जाहिरात

 

उपकुलसचिव निवास माने यांना पीएच.डी.

schedule14 Jul 26 person by visibility 269 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. निवास यशोदा संभाजी माने यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर झाली आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत व्यवस्थापन शास्त्र विषयांतर्गत ‘उच्च शिक्षण संस्थांमधील संगणकीकरण आणि ईआरपी प्रणालींची प्रभावी अंमलबजावणी’ या विषयावर डॉ. चिंतामणी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विद्यापीठास शोधप्रबंध सादर केला.

निवास माने हे प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या संगणकीकरण प्रक्रियेत उल्लेखनीय योगदान दिले आहे. प्रशासन व परीक्षा विभागातील अनेक संगणक प्रणालींच्या विकासामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, ओपीडीसी (OPDC), शिव दीक्षांत (Shiv Dikshant) आणि एसआरपीडी (SRPD) यांसारख्या प्रणालींच्या निर्मिती व अंमलबजावणीत त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. या प्रणालींमुळे विद्यापीठातील कामकाज अधिक गतिमान झाले असून वेळ, श्रम आणि निधी यांची मोठी बचत झाली आहे.

त्यांना संशोधन कार्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. केदार मारूलकर तसेच परीक्षा संचालक डॉ. अजित जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes