माळकर तिकटी, गंजी गल्ली ते बिंदू चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी धडक कारवाई
schedule15 Jul 26 person by visibility 87 categoryमहानगरपालिका
🔸️दोन लॉजिंग सील, अनधिकृत साहित्य जप्त
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र.2 छत्रपती शिवाजी मार्केट व अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज माळकर तिकटी, मटण मार्केट, गंजी गल्ली ते बिंदू चौक परिसरात धडक कारवाई करत दोन विनापरवाना लॉजिंग सील केली, तसेच कोंबडी लोखंडी जाळी ४, खुर्ची ६, लोखंडी पाईप ३४, लोखंडी जाळ्या १९, लोखंडी हातगाडी २, लोखंडी स्टॅंड १, पत्रा हातगाडी १, पत्रे १९ नग, लोखंडी ॲगल १७, स्टील हातगाडी १, स्टील रॅकेट १, लाकडी हातगाडी १, लोखंडी पत्रे 39, लोखंडी छपरी २४, लाकडी टेबल १, पानपट्टी १ व इतर साहित्य कायमस्वरूपी जप्त केले.
या कारवाईत बिंदू चौक येथील प्राईम रेसीडन्सी व हिंद लॉजिंग यांचे व्यवसाय परवाने सील करण्यात आले. तसेच परिसरातील अनधिकृत होर्डिंग्ज सायंकाळपर्यंत हटविण्याच्या सूचना संबंधित इमारत मालकांना देण्यात आल्या आहेत. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले साहित्य कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार करण्यात आली. उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, अरुणकुमार गवळी, निवास पोवार, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, संजय नागरगोजे, पदमल पाटील,प्रमोद बराले, अभिलाषा दळवी, परवाना अधिक्षक अशोक यादव, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, विभागीय कार्यालय क्र. 1 ते 4 कडील, इस्टेट, अग्निशमन व अतिक्रमण विभागातील कर्मचारी, तसेच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे 30 पोलिस कर्मचारी सहभागी झाले.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील अनधिकृत फेरीवाले, विनापरवाना व्यवसाय, रस्त्यांवरील अनधिकृत शेड्स व इतर अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमण हटवावे, अन्यथा जप्त करण्यात आलेले साहित्य कोणत्याही परिस्थितीत परत दिले जाणार नसल्याचा इशाराही महापालिकेने दिला आहे.