विकसित भारत युवा संवाद कार्यक्रम : प्रशिक्षणार्थींना लोकशाही मुल्यं, मतदान जनजागृती आणि जबाबदार नागरिकत्वाबाबत खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून मार्गदर्शन
schedule03 Nov 26 person by visibility 165 categoryशैक्षणिक
◼️राजर्षि शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत झाला कार्यक्रम
कोल्हापूर : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने आज कोल्हापुरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विकसित भारत युवा संवाद मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. आयटीआयमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना मतदानाचं महत्व, विकसित भारतासाठी शिक्षण व्यवस्थेची भूमिका आणि सध्याची निवडणूक प्रक्रिया तसेच सध्या सुरू असलेल्या मतदार सखोल पुर्नरिक्षण मोहिमेबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी सविस्तर विवेचन केले.
प्रत्येक नागरिकाने मतदान प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने विकसित भारत युवा संवाद कार्यक्रम आज कोल्हापुरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत घेण्यात आला. या कार्यक्रमाला भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाचे प्रतिनिधी शुभांग शिरोडकर यांनी एसआयआर अर्थात मतदार यादी पुर्नरिक्षण या विषयावर मार्गदर्शन करून मतदार यादीतील नोंदणी आणि अद्ययावतीकरण प्रक्रियेची माहिती दिली.
लोकशाहीमध्ये मतदानाला अत्यंत महत्व आहे. भारतीय घटनेने १८ वर्षावरील सर्व व्यक्तींना मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे सर्वांनीच मतदान प्रक्रियेत सहभागी होवून आपल्याला जो हवा तो लोकप्रनिधी आणि सरकार निवडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तरूणांनी जबाबदार नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावला पाहीजे, असे सांगितले. विकसित भारतासाठी शिक्षण व्यवस्थेची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे व्यवसायभिमूख शिक्षण घेवून स्वयंरोजगार निर्मिती करून इतरांना रोजगार उपलब्ध करून देण्याची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली. जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख यांनी माय भारत पोर्टलद्वारे युवकांना उपलब्ध होणार्या विविध संधी आणि उपक्रमांची माहिती दिली. तर लोकशाही मुल्यांचे महत्व, अधिक्षक गणेश भोसले यांनी पटवून देत प्रशिक्षणार्थिंना लोकशाहीची शपथ दिली.
प्रशिक्षणार्थिंनी निवडणूक प्रक्रिया, एसआयआर आणि स्टार्टअपविषयी विचारलेल्या विविध प्रश्नांचे मान्यवरांनी निरसन केले. कार्यक्रमाला प्राचार्य महेश आवटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी सतिश माने, अभिजीत पोवार, शिल्प निदेशक, गट निदेशक, प्रशिक्षाणार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.