SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कागल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; मंत्री हसन मुश्रीफ यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आग्रही मागणीराष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा, पालकांनी सहकार्य करावे : आरोग्याधिकारी प्रकाश पावरास्वच्छता मोहिमेत 20 टण प्लॅस्टिक, तणकट व खरमाती उठाववारणा दूध संघामार्फत तात्यासाहेब कोरे यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त ६ नोव्हेंबरला जातिवंत जनावरांचे भव्य प्रदर्शन चिपको आंदोलनाच्या खऱ्या सहचारिणी : विमला बहुगुणाकोल्हापूर : लोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलमंत्रालयात पुनमताई तोडकर यांनी घेतली मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेटकागल उरुसात भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अधिकाऱ्यांना सूचनाराजापूरवाडी येथील आरोग्य शिबिरात २९७ नागरिकांची तपासणीवारणा विद्यापीठाच्या पहिल्या युवा महोत्सवात कलागुणांचा जल्लोष!

जाहिरात

 

कागल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; मंत्री हसन मुश्रीफ यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आग्रही मागणी

schedule03 Nov 26 person by visibility 133 categoryराज्य

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले असून, परिस्थितीची दाहकता लक्षात घेऊन कागल तालुका तातडीने 'दुष्काळग्रस्त' म्हणून जाहीर करावा, अशी आग्रही मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. मंत्री मुश्रीफ यांनी मुंबईत महसूलमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यासंदर्भातील मागणीचे निवेदन दिले.
​        
या निवेदनात मंत्री मुश्रीफ यांनी नमूद केले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, पन्हाळा आणि गगनबावडा या सहा तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने तेथे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र, कागल तालुक्यातही या सहा तालुक्यांप्रमाणेच तीव्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.  मुश्रीफ यांनी पत्रात म्हटले आहे, कोल्हापुर जिल्ह्यातील राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, पन्हाळा, गगनबावडा या सहा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. कागल तालुक्यासह उर्वरित सहा तालुक्यांमध्येही अशीच दुष्काळग्रस्त स्थिती आहे. पावसाअभावी पिके करपून गेली असून पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे.
​         
जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणेच कागलमधील शेतकरीही या नैसर्गिक संकटाने मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे शासनाने कागल तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत करावा आणि शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत, कर्जवसुलीला स्थगिती, पीक नुकसान भरपाई व इतर सवलती लागू कराव्यात, अशी मागणी मुश्रीफ यांनी केली आहे.
​            
यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांना निवेदन देताना मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या मागणीवर महसूलमंत्र्यांनी सकारात्मक विचार करून लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes