SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूर दौऱ्यावर ; महायुतीच्या प्रचाराला मिळणार बळसोलापुरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात; शिक्षक संघटना आणि शिक्षक नेत्यांचा भक्कम पाठिंबा!शिरटी येथील आरोग्य शिबिरात २७२ नागरिकांची तपासणी; आजअखेर आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या ८ हजार ८२७ वरशिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन विजयी करा!दसरा महोत्सव शालेय बुद्धिबळ स्पर्धा: राजवर्धन, हर्ष आणि अमेय यांची दिमाखात आघाडी!शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार!गोकुळ दूध संघ निवडणूक : आमदार सतेज पाटील यांनी गगनबावडा येथे बजावला मतदानाचा हक्कजागतिक रजोनिवृत्ती दिन: महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकतासेवा संकल्प अभियाना अंतर्गत उप जिल्हा रुग्णालय गांधीनगर येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कोल्हापूर मार्फत 'फोकस ग्रुप डिस्कशन' चे आयोजनसोलापुरात कौस्तुभ गावडे यांची प्रचारात आघाडी; कौस्तुभ गावडे यांना शिक्षक आणि शिक्षण संस्थांचा वाढता पाठिंबा!

जाहिरात

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूर दौऱ्यावर ; महायुतीच्या प्रचाराला मिळणार बळ

schedule18 Oct 26 person by visibility 105 categoryराजकीय

◼️पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात दुपारी 2 : 30 वाजता मेळावा

कोल्हापूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या, सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामुळे भाजपा महायुतीच्या प्रचाराला नवी ऊर्जा आणि गती मिळणार आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी दिली.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात दुपारी 2 : 30 वाजता पदवीधर, शिक्षक आणि संस्थाचालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करणार आहेत.

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, भाजपा व महायुतीचे वरिष्ठ नेते, घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, शैक्षणिक संस्थांचे संचालक तसेच पदवीधर व शिक्षक मतदार उपस्थित राहणार आहेत. या संवादातून महायुतीची भूमिका, विकासाचा दृष्टिकोन आणि आगामी वाटचाल मतदारांपर्यंत पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील संघटनात्मक बैठकांच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे प्रचाराचे नियोजन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. पदवीधर व शिक्षक मतदारांशी थेट संवाद साधण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

राजेश पांडे म्हणाले, “पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांचा दौरा महायुतीच्या प्रचाराला निश्चितच बळ देणारा ठरेल. या दोन्ही जिल्ह्यांतील पदवीधर, शिक्षक, संस्थाचालक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणुकीच्या तयारीला अधिक गती मिळेल.”

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes